दहीवडीतील दीडशे कर्मचाऱ्यांकडून कोरोनासाठी सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:37 AM2021-03-06T04:37:58+5:302021-03-06T04:37:58+5:30
दहीवडी : येथील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शुक्रवारी आरोग्य विभाग, दहीवडी पंचायत समिती व नगरपंचायत ...
दहीवडी : येथील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शुक्रवारी आरोग्य विभाग, दहीवडी पंचायत समिती व नगरपंचायत यांच्या वतीने शहर परिसरात पन्नास आरोग्य पथकांद्वारे सर्व्हे करण्यात आला. यामध्ये १५० कर्मचाऱ्यांतर्फ कोरोनाचे रॅपिड सर्वेक्षण करण्यात आले.
दरम्यान, शहरातील सर्व प्रभागातील सर्व घराघरात जाऊन १५ हजार ९१७ नागरिकांची आरोग्य पथकाद्वारे कोरोनाचा संशयित, कोरोनासदृश लक्षणे, आयएलआर व सारी आजाराची रॅपिड सर्वेक्षण करण्यात आला.
माण तालुक्यात मध्यंतरी काही महिने मंदावलेला कोरोनाग्रस्त रुग्णवाढीचा वेग काही दिवसांपासून पुन्हा वाढत आहे. दहीवडी येथील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता २० ते २२ असे तीन दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वाढती रुग्णसंख्या पाहता प्रांताधिकारी यांनी दहीवडी शहर मंगळवारपासून(दि.२३) प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. अत्यावश्यक सेवावगळता सर्व आस्थापना बंद आहेत.
कोरोना रोखण्यासाठी दहीवडीतून शुक्रवारी पन्नास आरोग्य पथकांद्वारे रॅपिड सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी तालुक्यातील सोळा आरोग्य अधिकारी, २१ आरोग्यसेवक, २१ आरोग्यसेविका, नऊ गटप्रर्वतक, ४८ आशा, चाळीस अंगणवाडीसेविका व मदतनीस यांचा समावेश आहे. शहरातील सर्व प्रभाग तसेच वाड्यावस्त्यांवरील भागातील घरोघरी जाऊन नागरिकांची तसेच दहीवडी परिसरातील सर्व शासकीय-निमशासकीय व खासगी कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूरी शेळके, तालुका विस्तार अधिकारी प्रशांत सातपुते, विनायक कुलकर्णी, आरोग्य सहायक सुनील काशीद, नितीन खुळे, अनिल काशीद यांनी नियोजन केले होते.
चौकट
सोळा हजार नागरिकांची भेट
दहीवडी शहर परिसरातील सर्व प्रभागातील सर्व घराघरांत जाऊन १५ हजार ९१७ नागरिकांचा सर्व्हे केला. यामध्ये संशयित कोरोनासदृश लक्षणे असणारे १० रुग्ण आढळून आले. ऑक्सिजन कमी असणारे अकरा नागरिक तर तापमान जास्त असणारा १ रुग्ण आढळून आला. सर्व्हेदरम्यान सोळाजणांचे नमुने घेण्यात येऊन तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.
कोट
दहीवडी शहरातील सर्व कुटुंबाचा एकाच वेळी सर्व्हे करण्यात आला आहे. सर्व माहिती घेतल्यानंतर लाॅकडाऊन उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल .
- धनाजी जाधव, नगराध्यक्ष दहीवडी.
फोटो ०५दहिवडी-कोरोना
दहिवडी येथे शुक्रवारी आरोग्य पथकाद्वारे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. (छाया : नवनाथ