जिल्ह्यातील सर्व्हेमध्ये आढळले साडेतीन लाखजण व्याधिग्रस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:28 AM2021-06-02T04:28:31+5:302021-06-02T04:28:31+5:30

सातारा : जिल्ह्यात मागील वर्षात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत पहिला आणि दुसरा टप्पा पार पडला. दुसऱ्या टप्प्यातील सर्व्हेमध्ये ...

The survey in the district found that three and a half lakh people were infected ... | जिल्ह्यातील सर्व्हेमध्ये आढळले साडेतीन लाखजण व्याधिग्रस्त...

जिल्ह्यातील सर्व्हेमध्ये आढळले साडेतीन लाखजण व्याधिग्रस्त...

Next

सातारा : जिल्ह्यात मागील वर्षात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत पहिला आणि दुसरा टप्पा पार पडला. दुसऱ्या टप्प्यातील सर्व्हेमध्ये जवळपास ३१ लाख लोकांची तपासणी झाली. यामध्ये साडेतीन लाख लोक व्याधिग्रस्त आढळले. तसेच काही कोरोनाबाधितही निष्पन्न झाले. कोरोनाबाधितांवर वेळीच उपचार करता आले.

जिल्ह्यात मागील आॅक्टोबर महिन्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत दुसरी तपासणी मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्याची लोकसंख्या ३१ लाख ५६ हजारांच्या दरम्यान आहे, तर ६ लाख ८२ हजार कुटुंबे आहेत. या मोहिमेसाठी आरोग्य विभागाने पूर्ण नियोजन केले होते. जिल्ह्यातील सर्व कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी ९७४ पथके कार्यरत होती. या सर्व्हेमध्ये विविध आजार असलेले नागरिक आढळून आले. यामध्ये सर्वाधिक कोमॉर्बिड नागरिकांची संख्या अधिक होती. ३ लाख ४९ हजार १३९ लोक विविध व्याधिग्रस्त आढळले. यामध्ये कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाबाचे लोक होते. तसेच कोरोनाच्या संशयावरूनही काही जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्येही अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर आॅक्सिजन पातळी कमी असणारे नागरिकही या पथकांना आढळून आले होते.

जिल्ह्यात गेल्या वर्षी दोन टप्प्यांत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत सर्व्हे करण्यात आला होता. त्यामुळे व्याधिग्रस्तांना मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर अनेकांवर वेळेत उपचार होण्यास मदत झाली.

चौकट :

कोरोनाचे २५७६, सारीचे १० हजार रुग्ण...

या सर्व्हेमध्ये कोरोनाच्या संशयावरून ९१०८ जणांची चाचणी करण्यात आली. यामधील २५७६ जण कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या सर्वांवर विविध ठिकाणी वेळेत उपचार करणे शक्य झाले. त्याचबरोबर सारीचे संशयित २६४९२ होते. त्यामधील १०४५० जणांना संदर्भीत करण्यात आले. जिल्ह्यात सर्वात अधिक सर्व्हेमध्ये कोरोनाबाधित ग्रामीण भागात २०६५ आणि शहरांमध्ये ५११ नागरिक आढळून आले होते.

......................................

चौकट :

९८ टक्के लोकांची तपासणी...

जिल्ह्यातील ९८ टक्के लोकांची तपासणी झाली होती. जावळी तालुक्यातील १ लाख, कऱ्हाडमध्ये ६ लाख, खंडाळा तालुक्यात सुमारे दीड लाख, खटाव २ लाख ८७ हजार, कोरेगाव अडीच लाख, महाबळेश्वर ६० हजार, माण २ लाख ४० हजार, पाटण २ लाख ९१ हजार, फलटण साडेतीन लाख, सातारा तालुका साडेपाच लाख आणि वाई तालुक्यात १ लाख ९७ हजार लोकांची तपासणी झाली.

.....................................................

कऱ्हाडमध्ये बाधित अधिक आढळले...

मोहिमेमध्ये कोरोनाच्या संशयावरून अनेकांची चाचणी करण्यात आली. यामध्ये कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक ४७४ जण बाधित स्पष्ट झाले होते. तर जावळी तालुक्यात ११७, खंडाळा २३८, खटाव ४४५, कोरेगाव १२४, महाबळेश्वर तालुक्यात ४९, माण १६४, पाटण ७६, फलटण तालुक्यात ४६५, सातारा तालुका २५९, आणि वाई तालुक्यात १६५ जण कोरोनाबाधित आढळून आले होते.

............................................................

कोमॉर्बिड कऱ्हाडमध्ये अधिक...

सर्व्हेमध्ये कोमॉर्बिड व्यक्ती सर्वाधिक कऱ्हाड तालुक्यात १ लाख १३ हजार आढळून आल्या. त्यानंतर सातारा तालुक्यात ३३८६०, वाई १९७०७, महाबळेश्वरात १८४१४ आढळून आले होते.

चौकट :

एकूण कुटुंब संख्या ६८२८०९

किती कुटुंबाचे झाले सर्वेक्षण ६६५६४३

सर्वेक्षणासाठीची पथके ९७४

तपासणी झालेली लोकसंख्या ३०८३९५७

.....................

कोणत्या आजाराचे किती रुग्ण आढळले

दुर्धर व्याधी ३४९१३९

सारी लक्षणे २६४९२

संदर्भीत व्यक्ती १०४५०

कोरोना स्वॉब घेतला ९१०८

बाधित २५७६

आॅक्सिजन पातळी कमी २०२२

..................................

Web Title: The survey in the district found that three and a half lakh people were infected ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.