सूर्यवंशी यांची शेती म्हणजे आदर्श व्यवस्थापनाचा नमुना : पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:13+5:302021-07-03T04:24:13+5:30

म्हसवड : तुपेवाडी येथील शेतकरी सुभाष सूर्यवंशी व कुटुंबीयांनी जोपासलेली आधुनिक शेती ही कृषी व्यवस्थापनाचा ...

Suryavanshi's farming is a model of ideal management: Pawar | सूर्यवंशी यांची शेती म्हणजे आदर्श व्यवस्थापनाचा नमुना : पवार

सूर्यवंशी यांची शेती म्हणजे आदर्श व्यवस्थापनाचा नमुना : पवार

Next

म्हसवड : तुपेवाडी येथील शेतकरी सुभाष सूर्यवंशी व कुटुंबीयांनी जोपासलेली आधुनिक शेती ही कृषी व्यवस्थापनाचा आदर्श नमुना आहे, असे प्रतिपादन माण तालुका कृषी अधिकारी प्रकाश पवार यांनी केले.

कृषी दिनानिमित्ताने तालुका कृषी अधिकारी प्रकाश पवार यांनी तुपेवाडी येथील सुभाष सूर्यवंशी यांच्या शेतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी विश्वंभर बाबर, कृषी पर्यवेक्षक जयवंत लोखंडे उपस्थित होते.

कृषी दिनाचे औचित्य साधून तालुका कृषी विभागातर्फे प्रकाश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी माण तालुक्यातील अनेक प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली. सुभाष सूर्यवंशी व कुटुंबीयांनी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त भगवा डाळिंब, सीताफळ, सुपर गोल्डन पेरू, ढोबळी मिरची इत्यादींची शेती आदर्शवत केल्याबद्दल प्रकाश पवार यांनी समाधान व्यक्त केले. शेतात राबवलेले विविध उपक्रम आदर्श कृषी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती रोग व कीड नियंत्रण, पाणी व्यवस्थापन इत्यादी बाबींच्या दर्जेदार नियोजनाबद्दल प्रकाश पवार यांनी सूर्यवंशी यांच्या कृषी कार्याचा गौरव केला.

यावेळी रामचंद्र काटकर, यश काटकर. केशव सूर्यवंशी, कुमार सूर्यवंशी उपस्थित होते.

020721\img-20210702-wa0047.jpg

फोटो - कृषी दिनाच्या निमित्ताने माण तालुका कृषी अधिकाऱ्यांची सुभाष सुर्यवंशी यांच्या शेतीला भेट

Web Title: Suryavanshi's farming is a model of ideal management: Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.