Satara: कऱ्हाडकरांच्या लढ्याला यश, मीटर पद्धतीने बिल आकारणीस स्थगिती कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 05:31 PM2023-07-01T17:31:39+5:302023-07-01T17:32:00+5:30

कऱ्हाड : कऱ्हाड शहरातील २४ तास पाणी योजनेच्या मीटरप्रमाणे पाणी बिलांच्या वसुलीवरील स्थगिती कायम ठेवताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी ...

Suspension of metered billing continued in Karad, recovery of water bills at old rates | Satara: कऱ्हाडकरांच्या लढ्याला यश, मीटर पद्धतीने बिल आकारणीस स्थगिती कायम

Satara: कऱ्हाडकरांच्या लढ्याला यश, मीटर पद्धतीने बिल आकारणीस स्थगिती कायम

googlenewsNext

कऱ्हाड : कऱ्हाड शहरातील २४ तास पाणी योजनेच्या मीटरप्रमाणे पाणी बिलांच्या वसुलीवरील स्थगिती कायम ठेवताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी जुन्या दराप्रमाणे वार्षिक पाणीपट्टी वसुली करण्यास नगरपालिकेस आदेश दिले आहेत. जुन्या बिलांच्या वसुलीवरील कोणतीही स्थगिती नसल्याचे पत्र शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कऱ्हाड पालिकेस दिले असून, तातडीने जुन्या दराने पाणी बिलांची वसुली करण्यास सूचना केल्या आहेत.

कऱ्हाड नगरपालिकेत आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२२ पासून कऱ्हाडमध्ये मीटर पद्धतीने पाणी बिले आकारणीचा निर्णय तत्कालीन मुख्याधिकारी व प्रशासक रमाकांत डाके यांनी घेतला होता. त्याप्रमाणे तीन महिन्यांची बिले कऱ्हाडकरांना देण्यात आली होती. मात्र, भरमसाट आकारणी केल्याची व मीटर पाणी येण्यापूर्वी हवेने फिरत असल्याची तक्रार कऱ्हाडवासीयांनी केली होती. याबाबत पालिकेतील विविध आघाड्या व राजकीय पक्षांकडूनही आंदोलने करण्यात आली होती. परिणामी याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन मीटर पद्धतीने पाणी बिलांच्या आकारणीला स्थगिती दिली होती. त्याचप्रमाणे पाणीपट्टी वसुली स्थगिती दिली होती. दरम्यान, मीटर पद्धतीने बिल आकारणीवर कोणताही निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे पाणीपट्टीची आकारणी दिले वसूल केली जात नव्हती. त्यामुळे भविष्यात वीज बिले थकून कऱ्हाड शहराचा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता होती.

यामुळे पालिकेत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी नगरपालिकेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३१ मे रोजी पत्र पाठविले होते. साताऱ्याचे नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पाणीपट्टीचा प्रश्न तात्पुरता निकाली काढताना नव्या मीटर पद्धतीने बिलांच्या वसुलीला स्थगिती दिली असून, जुन्या दराने पाणी बिले वसूल करण्यास कोणतीही स्थगिती नाही. त्यामुळे जुन्या दराने पाणी बिले वसूल करण्यात यावीत, असे पत्र नगरपालिकेला दिले. त्यामुळे नगरपालिकेचा पाणीपट्टी वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे कऱ्हाडकारांनी नवीन पाणी मीटर पद्धतीने पाणी बिलांचे आकारणी विरोधात दिलेल्या लढ्याला यश आल्याचे दिसत आहे.

Web Title: Suspension of metered billing continued in Karad, recovery of water bills at old rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.