थकवलेले दोनशे कोटी रुपये द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 05:41 PM2020-07-29T17:41:51+5:302020-07-29T17:45:04+5:30

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकवलेले दोनशे कोटी रुपये द्यावेत तसेच सातारा जिल्ह्यामध्ये यंदा पाऊसमान कमी झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ६ आॅगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

Swabhimani Shetkari Sanghatana warns of agitation | थकवलेले दोनशे कोटी रुपये द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा

थकवलेले दोनशे कोटी रुपये द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

सातारा : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकवलेले दोनशे कोटी रुपये द्यावेत तसेच सातारा जिल्ह्यामध्ये यंदा पाऊसमान कमी झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ६ आॅगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार इतका प्रोत्साहन भत्ता देणार असल्याचे घोषित केले. शेतकऱ्यांनी उसनवारी करून कर्जाच्या रकमा भरल्या; परंतु अद्याप त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. तसेच साखर कारखान्यांनी ऊस घेतल्यानंतर एफ आर पी च्या रकमा थकवलेल्या आहेत.

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी कर्ज बाजारी होऊन पिकांची पेरणी लागवड केली; परंतु सातारा जिल्ह्यामध्ये पाऊसच न पडल्यामुळे पेरणी वाया जाऊन पिकाचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे. आॅगस्ट महिना उजाडला तरी पाऊस नसल्यामुळे शासनाने सातारा जिल्'ात अति तातडीने आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करावा.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्यस्तरीय कार्यकारी समितीचे सदस्य अर्जुनराव साळुंखे, देवानंद पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, राज्य प्रवक्ते अनिल पवार, दादासाहेब यादव, तानाजी देशमुख, रमेश पिसाळ, नितीन यादव, बापूराव साळुंखे, प्रमोद जगदाळे, संजय जाधव, संजय कांबळे, विजय चव्हाण, रामचंद्र मोरे, दत्ता पाटील, महादेव डोंगरे आदींनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana warns of agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.