स्वानंद कुलकर्णी यांना पी. एचडी. प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:52 AM2021-02-26T04:52:55+5:302021-02-26T04:52:55+5:30

म्युनिसिपल कचरा व त्यातील विशेषतः प्लास्टिक कचरा यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. प्लास्टिक कचऱ्याचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाची ...

Swanand Kulkarni to P. HD. Provided | स्वानंद कुलकर्णी यांना पी. एचडी. प्रदान

स्वानंद कुलकर्णी यांना पी. एचडी. प्रदान

Next

म्युनिसिपल कचरा व त्यातील विशेषतः प्लास्टिक कचरा यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. प्लास्टिक कचऱ्याचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाची हानी वाढत आहे. स्वानंद कुलकर्णी यांनी केलेल्या संशोधनामध्ये कचऱ्यातील प्लास्टिकमधून पायरोलिस पद्धतीने ऑईलची निर्मिती करून त्याचा वापर डांबरी रस्त्याच्या कामांमध्ये करण्याचे प्रयोग केले व हे प्रयोग यशस्वी झाले आहेत.

या संशोधनामध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणेचे डाॅ. एम. एस. रणदिवे यांचे कुलकर्णी यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसुन जोहरी यांनी त्यांचा सत्कार केला.

फोटो : 25 स्वानंद कुलकर्णी 01

Web Title: Swanand Kulkarni to P. HD. Provided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.