भाजपकडून आमदारकी लढविण्यासाठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:42 PM2019-08-30T23:42:56+5:302019-08-30T23:43:10+5:30

सातारा : जिल्ह्यात एकही आमदार नसलेल्या भारतीय जनता पक्षातर्फे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. भाजपतर्फे ...

Swarm of BJP to contest MLA | भाजपकडून आमदारकी लढविण्यासाठी झुंबड

भाजपकडून आमदारकी लढविण्यासाठी झुंबड

Next

सातारा : जिल्ह्यात एकही आमदार नसलेल्या भारतीय जनता पक्षातर्फे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. भाजपतर्फे जिल्ह्यातील आठही मतदारसंघांसाठी शुक्रवारी (दि. ३०) मुलाखती घेतल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले , दीपक पवार, दिलीप येळगावकर, अतुल भोसले यांच्यासह ५८ इच्छुक उमेदवारांनी यावेळी मुलाखती दिल्या.
येथील शासकीय विश्रामगृहावर पक्षातर्फे मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. सर्वच मतदारसंघातून इच्छुकांनी गर्दी केली होती. इच्छुक महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पक्ष निरीक्षक आमदार अनिल सोले, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मुलाखती घेतल्या.
दरम्यान, दि. ३० रोजी सकाळी साडेदहा वाजता सर्वप्रथम कोअर कमिटी बैठक झाली. कोअर कमिटी सदस्यांकडून मतदारसंघनिहाय शक्तिकेंद्र्र प्रमुख, बुथप्रमुख, गट-गण, प्रभाग या सर्वांची माहिती अनिल सोले यांनी घेतली. यानंतर मतदारसंघाप्रमाणे मुलाखतीस सुरुवात झाली.
लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केलेले शैलेंद्र वीर यांनीही भाजपतर्फे वाई विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखत दिली. २००९ मध्ये झालेली कोरेगाव विधानसभा निवडणूक शिवसेनेतर्फे लढलेले संतोष जाधव यांनी कोरेगाव व सातारा-जावळीतून उमेदवारीसाठी मुलाखत दिली. फलटण मतदारसंघातून भाजपतर्फे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांचे नाव पुढे येत होते, ते दिगंबर आगवणे आणि माण-खटावमधून भाजपतर्फे इच्छुक असणारे जयकुमार गोरे यांचीही यावेळी अनुपस्थिती होती.

या मतदारसंघात
हे इच्छुक
सातारा-जावळी : माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पश्चिम महाराष्ट्र विकास परिषदेचे अध्यक्ष दीपक पवार, अमित कदम, संतोष जाधव, अभय पवार, स्मिता निकम, सुनिशा शहा.
वाई-खंडाळा-महाबळेश्वर : माजी आमदार मदन भोसले, चंद्रकांत काळे, मोनिका धायगुडे, अविनाश फरांदे, प्रशांत जगताप, रामदास शिंदे, दीपक जाधव, सचिन घाडगे, प्रदीप क्षीरसागर, शैलेंद्र वीर, दिनकर शिंदे.
कोरेगाव : महेश शिंदे, संतोष जाधव, विवेक कदम, रणजित फाळके, प्रभाकर साबळे, रमेश माने, सुवर्णा राजे.

Web Title: Swarm of BJP to contest MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.