कातरखटावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:58 AM2021-02-23T04:58:48+5:302021-02-23T04:58:48+5:30

कातरखटाव : कातरखटाव (ता. खटाव) येथे शनिवारी रात्रीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, माझी सरपंच तानाजी बागल यांच्या घरातून ...

A swarm of thieves in Katarkhatav | कातरखटावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

कातरखटावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

googlenewsNext

कातरखटाव : कातरखटाव (ता. खटाव) येथे शनिवारी रात्रीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, माझी सरपंच तानाजी बागल यांच्या घरातून दीड हजारांची रोकड पळविली आहे. त्यानंतर मध्यवस्तीत पाच ठिकाणी बंद घरांचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, तर काही ठिकाणी कपाटातील सामान विस्कटून टाकले होते. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विशाल क्षीरसागर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून भांड्याकुड्यामधील पाचशे रुपये लंपास केले आहेत. दुसरीकडे तोच प्रकार अरुण बागल यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कागदपत्रांची बॅग बाहेर फेकून दिली होती. त्यानंतर रत्नाकर बोडके यांच्या बंद असणाऱ्या तिन्ही घरांचे कडी-कोयंडे तोडून घरात प्रवेश केला; पण इथे काहीच हाती न लागल्यामुळे कपड्यांची नासधूस केली. अशाच तऱ्हेने आदित्य शिंदे यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे लोकांच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली असून, चोरट्यांनी एकूण दोन हजारांची रोकड लंपास केली आहे

चौकट :

बंद दरवाजा टार्गेट

पहाटे तीन ते साडेतीन वाजेपर्यंत चाललेल्या घटनेमध्ये चोरट्यांनी पाच ते सहा ठिकाणी बंद घरे फोडण्याचा प्रयत्न केला आहे. कोयंडा कापून कुलुपे फेकून देण्यात आल्याचे दिसून आले आहे.

Web Title: A swarm of thieves in Katarkhatav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.