जांभूळणीच्या सरपंचपदी स्वाती काळेल बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:35 AM2021-03-07T04:35:57+5:302021-03-07T04:35:57+5:30
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील अटीतटीचे राजकारण करणाऱ्या जांभूळणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाती सिद्धेश्वर काळेल तर ...
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील अटीतटीचे राजकारण करणाऱ्या जांभूळणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाती सिद्धेश्वर काळेल तर उपसरपंचपदी बापू राजाराम काळेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी करत आनंद साजरा केला.
ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित सभेस सिद्धार्थ तोरणे, सिंधू कोकरे, सुनीता कोकरे,राणी काळेल,कविता सरगर हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तर विरोधी गटातील सदस्य अनुपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. बी. भोसले व ग्रामसेवक बी. एम. बोराटे यांनी काम पाहिले.
माण तालुक्यात महत्त्वाची मानली जाणाऱ्या जांभूळणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांचे खंदे समर्थक अभय जगताप व सिद्धेश्वर काळेल यांनी मूलभूत विकासाच्या मुद्द्यावर ग्रामस्थांसह तरुणांचा विश्वास संपादन केला. आणि तीर्थक्षेत्र श्री भोजलिंग परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून ११ पैकी ७ सदस्य निवडून आणून भाजपप्रणीत आ. जयकुमार गोरे पुरस्कृत भोजलिंग पॅनलचा धुवा उडवून सत्ता काबीज केली. सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असल्याने स्वाती काळेल यांची बिनविरोध वर्णी लागली. या निवडीबद्दल पालकमंत्री बाळासाहेब पाटील, प्रभाकर देशमुुख यांच्यासह अनेक मान्यवरांंनी कौतुक केले.