कºहाडात ‘स्वाभिमानी’चे ‘टाळे ठोको’ आंदोलन--तर ‘कृष्णा’च्या गटआॅफिसला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 09:57 PM2019-01-12T21:57:54+5:302019-01-12T21:59:10+5:30
एफआरपीवर १५ टक्के व्याज शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी कायद्यातील तरतूद असूनही कारखानदारांनी हा कायदा मोडला. याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कºहाड येथे
कºहाड : एफआरपीवर १५ टक्के व्याज शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी कायद्यातील तरतूद असूनही कारखानदारांनी हा कायदा मोडला. याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कºहाड येथे शनिवारी ‘कृष्णा’च्या गटआॅफिस कार्यालयास टाळे ठोकले तर जयवंत व रयतच्या गट आॅफिसपुढे घोषणाबाजी केली.
स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली कºहाडात शनिवारी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन नलवडे म्हणाले, ‘जिल्'ातील कारखानदारांनी एफआरपीचा कायदा मोडत एफआरपीची ८० टक्के रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यास सुरूवात केली आहे. हा शेतकºयांवर अन्याय आहे. अशा कायदा मोडणाºया कारखानदारांवर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. मात्र संघटना अथवा शेतकºयांनी आपल्या हक्काच्या पैशासाठी आंदोलन केले की त्यांना मात्र तात्काळ नोटीस दिली जाते. कारखानदार कायदा तुडवणार असतील तर आम्हीही कायदा तुडवणार आहोत. ज्या पद्धतीने शेतकरी व संघटनांना कायदाचा धाक दाखवला जातो त्याचप्रमाणे कारखानदार, अध्यक्ष व संचालक मंडळाला कायद्याचा धाक दाखवला पाहिजे.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही रयत, कृष्णा कारखान्याच्या गट आॅफिससमोर जोरदार घोषणाबाजी केली. ऊस आमच्या मालकीचा नाही कोणाच्या बापाचा, एफआरपी अधिक २०० रूपये दर मिळालाच पाहिजे, कायदा मोडणाºया कारखानदारांवर गुन्हे दाखल करा, अशा घोषणा केल्या. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऊसाच्या एकरकमी पहिल्या हप्त्यासाठी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने शनिवारी कºहाड येथील कृष्णा कारखान्याच्या गट आॅफिसला टाळे ठोकले. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होेते. ( छाया : युवराज मस्के)