श्रीमंत गायकवाड ठरले वेगवान जलतरणपटू
By admin | Published: November 4, 2014 09:01 PM2014-11-04T21:01:41+5:302014-11-05T00:02:29+5:30
खुल्या जलतरण स्पर्धेत मिळविले यश
सातारा : भारत माता जलतरण ग्रुपच्या वतीने कृष्णा घाट वडूथ, ता. सातारा येथे खुल्या जलतरण स्पर्धेचे ट्रॅक पद्धतीने आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सातारा, कऱ्हाड, सांगली, कोल्हापूर, पुणे, मिलिटरी जवान मिळून पाच वर्षांपासून ८५ वर्षांपर्यंत १९० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये श्रीमंत गायकवाड वेगवान जलतरण ठरले.
स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस समारंभ जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण साबळे-पाटील, स्नेहल कदम, रेश्मा शेडगे, नितीन कारळकर, क्रीडा अधिकारी रत्नागिरी, दिनकर सावंत स्विमिंग कोच, पुणे, माजी उपसभापती वनिता गोरे यांच्या जस्ते पार पडला.
श्रीमंत गायकवाड यांनी वेगवान जलतरणपटूचा किताब पटकावला.
स्पर्धेत रुपाली परदेशी, रितू पेंडसे, ऋतुजा चोरगे, प्राधी बोबडे, मृणाल जाधव, अंकिता पवार, निखीता पवार, दीप्ती साबळे, अनिशा गुजर, मयुरी साबळे, शीतल मोरे,अनुजा मोरे, रेखा साबळे, वंदना साबळे, विशाल गायकवाड, शुभम साबळे, करण बोबडे, शार्दूल कदम, आदित्य जाधव, स्वप्नील गोडसे, सुयश गोडसे, विनय कदम, प्रतिक चोरगे, कुणाल साबळे, विक्रम साबळे, अथर्व डोंबे, केदार झाड, प्रणव कदम, संकेत जरे, शंतनू कदम, पराग साबळे, प्रसाद साबळे, रोहन साबळे, प्रतिक साबळे, उदय सावंत, निखिल जगदाळे, समीर साबळे, मयूर साबळे, अभिजित साबळे, अनिकेत साबळे, राज साबळे, मनोज साबळे, भानुदास साबळे, राम मोरे, मच्छिंद्र साबळे, कृष्णा सोनमळे, अर्जुन चोरगे, हेमंत मुळीक, नितीन गुजर, रामचंद्र बोराटे, तानाज जाधव, नारायण जाधव, नितीन डोंबे यांनी रोख बक्षीस व गौरवचिन्ह पटकावली. इयत्ता दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजय साबळे, वसंत साबळे, बळवंत साबळे, नंदकुमार साबळे, श्रीरंग मोरे, रमेश बोडके, आप्पासाहेब साबळे, पोपट मदने, सुधीर चोरगे, सतीश कदम, भगवान चोरगे, प्रा. रवींद्र साबळे, सत्यवान हवाळे यांनी परिश्रम घेतले. ग्रामीण भागात स्पर्धा यशस्वी ठरली. (प्रतिनिधी)