शिक्षक बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून आगळीच शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 10:10 PM2019-10-15T22:10:04+5:302019-10-15T22:10:11+5:30
अशा प्रकारची शपथ या कर्मचाºयांकडून घेण्यात आली. पुरोगामी जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणाºया शिक्षक बँकेतील ही घटना लाजिरवाणी व माणुसकीला काळिमा फासणारी आहे.
मलटण : शिक्षक बँकेच्या कर्मचाऱ्यांना बँकेतील कर्जवाटपाची कागदपत्रे विरोधी गटाला पुरवल्याच्या संशयावरून सोमेश्वर येथील मंदिरात शपथ घ्यावी लागली. तसेच ही शपथ पाणी हातात घेऊन दिली गेल्याने अंधश्रद्धेला खतपाणी मिळाले आहे. दरम्यान, संचालक मंडळाने असा कोणताही प्रकार केला नसल्याचा खुलासा बँकेतर्फे करण्यात आला.
शिक्षक बँक ही १९४८ मध्ये स्थापन झाली. बँकेची संपूर्ण जबाबदारी संचालकावर असल्यामुळे जबाबदारपणे बँक सांभाळणे आवश्यक आहे. मात्र, कर्मचाºयांकडून चुकीचे प्रकार होत असल्याने शिक्षकांनी कर्मचा-यांना शपथेवर खरे-खोटे करण्याचा प्रयत्न केला आहे.
‘मी शिक्षक बँकेतील कोणतेही कागदपत्रे बाहेर नेले नाही किंवा तसे करताना पाहिले नाही आणि जर मी खोटे बोलत असेन तर माझ्या वंशाचे खंडन होईल आणि याची प्रचिती सव्वा महिन्यात येईल,’ अशा प्रकारची शपथ या कर्मचा-यांकडून घेण्यात आली. पुरोगामी जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणाºया शिक्षक बँकेतील ही घटना लाजिरवाणी व माणुसकीला काळिमा फासणारी आहे.
हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील कर्मचाºयांवर दबाव आणून केलेला हा प्रकार आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाºया या प्रकारामागील अपप्रवृत्तींना कडक शासन झाले पाहिजे.
-लक्ष्मण गुंजवटे सभासद,
प्राथमिक शिक्षक बँक
या घटनेशी शिक्षक सहकारी बँकेच्या कोणत्याही संचालकाचा संबंध नाही. सभासदांच्या हितासाठी कायम तत्पर असतो. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन विरोधकांनी रचलेले हे षडयंत्र असू शकते.
-राजेंद्र घोरपडे चेअरमन, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक