जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘रिपाइं’चे लाक्षणिक उपोषण
By admin | Published: December 19, 2014 09:14 PM2014-12-19T21:14:46+5:302014-12-19T23:34:46+5:30
सातारा शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे बंद करावेत. मटका, जुगार, क्लब असे अवैध व्यवसाय बंद करावेत,
सातारा : देगाव फाट्यावरील भाजीविक्रेत्यांच्या जागेचा प्रश्न तसेच दलित समाजाच्या इतर प्रश्नांसंदर्भात प्रशासनाला जाग आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शुक्रवार, दि.१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.सातारा तालुक्यातील देगाव फाटयावरील तीस-चाळीस भाजीपाला विके्रते त्यामध्ये प्रामुख्याने महिला आहेत. भाजीविक्रीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्याव्यात. अॅट्रॉसिटी अॅक्टबाबत जागृती निर्माण होण्यासाठी कार्यशाळा घ्यावी. विशेष घटक योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या साकव, रस्ते, याचा मुख्य उद्देश हा मागासवर्गीय वस्तीत मुख्य बाजारपेठेला जोडण्याचा आहे; परंतु काही अधिकारी व लोकप्रतिनिधी संगनमताने तो इतरत्र वापरत आहेत. भीमाई स्मारक, डॉ. आंबेडकर स्मारक, सामाजिक न्याय भवन, कोरेगाव बॉम्बे रेस्टॉरंट आदी कामे त्वरित करावीत, सातारा शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे बंद करावेत. मटका, जुगार, क्लब असे अवैध व्यवसाय बंद करावेत, मागासवर्गीयांना कृषी योजनांपासून वंचित ठेवणाऱ्या माण कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर व वसवाडे यांना चार वर्षे पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात ‘आरपीआय’चे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, संतोष ओव्हाळ, सागर सावंत, मदन खंकाळ, विशाल बोकेफोडे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)े