फलटणमध्ये माउलींसाठी प्रतिकात्मक समाजआरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 11:00 AM2021-07-13T11:00:00+5:302021-07-13T11:02:09+5:30
sant dnyaneshwar palkhi Satara : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा यंदाही रद्द झाला असला तरी फलटणमध्ये विमानतळावर प्रतीकात्मक समाज आरती व माऊलीची पूजा करण्यात आली.
फलटण : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा यंदाही रद्द झाला असला तरी फलटणमध्ये विमानतळावर प्रतीकात्मक समाज आरती व माऊलीची पूजा करण्यात आली.
जिल्ह्यात संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या तरडगावच्या मुक्कामानंतर माऊलींचा सोहळा फलटणकडे रवाना होतो. आजच्या दिवशी फलटण येथील विमानतळ परिसरातील पटांगणावर लाखो वारकरी विसावा घेतात.
यंदा मात्र वाढत्या कोरोनामुळे शासनाने सोहळा रद्द केल्याने पालखी निघाली नसली तरी तिथीप्रमाणे ज्या त्या गावात प्रति सोहळा साजरा केला जातो. आजच्या दिवशी पालखी तिथीप्रमाणे फलटणला येत असल्याने फलटणमध्ये पालखी ज्या ठिकाणी विसावते त्या ठिकाणी म्हणजे विमानतळावर प्रतिकात्मक सोहळा समाजआरती करून साजरा करण्यात आला.
ज्ञानेश्वर माऊलीचा जयघोष करण्यात आला. ही समाज आरती मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून करण्यात आली. भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक अशोकराव जाधव, अजय माळवे, विराज खराडे, बबनराव निकम, जीवन केंजळे, डॉ. सुनीता खराडे, बाळासाहेब ननवरे, किरण बोळे, दादासाहेब चोरमले, युवराज शिंदे, अभिजित सोनवणे उपस्थित होते.