ताई, माई, आक्का... उमेदवारीचा निर्धार पक्का

By Admin | Published: January 19, 2017 12:07 AM2017-01-19T00:07:10+5:302017-01-19T00:07:10+5:30

राष्ट्रवादी भवनात महिलांची गर्दी : १९२ जागांसाठी ७८0 इच्छुक; राज्य निवड मंडळापुढे जाणार यादी

Tai, Mai, Aaka ... the determination of the candidature is sure | ताई, माई, आक्का... उमेदवारीचा निर्धार पक्का

ताई, माई, आक्का... उमेदवारीचा निर्धार पक्का

googlenewsNext


सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून ७८0 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. विशेष म्हणजे यंदा सर्वच स्तरातील महिलांचा सहभाग अत्यंत लक्षणीय ठरला असून, ‘ताई, माई, आक्का... निवडणुकीचा निर्धार पक्का’ अशा अविर्भात अनेक महिला याठिकाणी दिसून आल्या. जागा १९२ आणि इच्छुक ७८0 अशा अवस्थेत उमेदवारी वाटपाची तारेवरची कसरत नेत्यांना करावी लागणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
केंद्रात व राज्यात सत्ता नसतानाही राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढणाऱ्यांची संख्या मोठी आहे, याचा संदेशच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतेमंडळींनी या मुलाखतींच्या माध्यमातून इतर पक्षांना दिला आहे. सोमवार, दि. १६ जानेवारीपासून मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी वाई, महाबळेश्वर, खंडाळा व फलटण या चार तालुक्यांतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या.
फलटणमध्ये साखरवाडी, विडणी, गुणवरे, कोळकी, तरडगाव, हिंगणगाव, गिरवी हे सात गट आहेत. तर साखरवाडी, विडणी, गुणवरे, सस्तेवाडी, सांगवी, आसू, कोळकी, तरडगाव, हिंगणगाव, गिरवी हे १४ गण आहेत. एकूण २१ जागांसाठी १०९ जण इच्छुक आहेत.
खंडाळ्यात भादे, शिरवळ, खेड बुद्रुक हे तीन गट व भादे, शिरवळ, खेड बुद्रुक, बावडा, पळशी, नायगाव हे सहा गण आहेत. एकूण नऊ जागांसाठी २८ जण इच्छुक आहेत. वाईत ओझर्डे, भुर्इंज, बावधन, यशवंतनगर हे चार गट असून अभेपुरी, शेंदूरजणे, पाचवड, केंजळ, यशवंतनगर, बावधन, भुर्इंज, ओझर्डे हे आठ गण आहेत. यासाठी ६० जण इच्छूक आहेत. महाबळेश्वरमध्ये भिलार, तळदेव हे दोन जिल्हा परिषद गट तर वाडाकुंभरोशी, मेटगुताड, तळदेव, भिलार हे चार गण आहेत. सहा जागांसाठी १४ जण इच्छुक आहेत.
जावळीत कुसुंबी, कुडाळ, म्हसवे हे तीन गट तर खर्शी-बारामुरे, सायगाव, आंबेघर तर्फ मेढा, म्हसवे, कुडाळ, कुसुंबी हे सहा गण आहेत. नऊ जागांसाठी ५४ जण इच्छुक आहेत. कोरेगावात सातारारोड, पिंपोडे बुद्रुक, ल्हासुर्णे, वाठार किरोली, वाठार स्टेशन हे पाच गट व किन्हई, साप, देऊर, कुमठे, वाठार स्टेशन, वाठार किरोली, ल्हासुर्णे, पिंपोडे बुद्रुक, सातारारोड हे दहा गण असून, ७६ उमेदवार इच्छुक आहेत.
माणमध्ये मार्डी, गोंदवले बुद्रुक, कुकुडवाड, आंधळी, बिदाल हे पाच गट असून, वावरहिरे, मलवडी, वरकुटे-मलवडी, पळशी, वरकुटे-म्हसवड, बिदाल, आंधळी, कुकुडवाड, गोंदवले, मार्डी हे दहा गण आहेत. यासाठी ४३ उमेदवार रिंगणात आहे. खटावात पुसेसावळी, खटाव, मायणी, पुसेगाव, निमसोड, औंध हे सहा जिल्हा परिषद गट तर कुरोली, कातरखटाव, बुध, औंध, निमसोड, पुसेगाव, कलेढोण, विसापूर, म्हासुुर्णे, मायणी, खटाव, पुसेसावळी १२ गण आहेत. एकूण १८ जागांसाठी ५३ जण इच्छुक आहेत.
साताऱ्यात शेंद्रे, वर्णे, कोडोली, कारी, लिंब, शाहूपुरी, नागठाणे, गोडोली, वनवासवाडी, पाटखळ हे दहा गट तर शिवथर, तासगाव, खेड, अतित, कोंडवे, पाटखळ, वनवासवाडी, गोडोली, नागठाणे, शाहूपुरी, किडगाव, अंबवडे बुद्रुक, संभाजीनगर, अपशिंगे, दरे खुर्द्र, लिंब, कारी, कोडोली, वर्णे, शेंद्रे हे २० गण आहेत. एकूण ३० जागांसाठी ११७ उमेदवार रिंगणात आहेत. पाटणमध्ये मल्हारपेठ, म्हावशी, मंद्रुणकोळे, गोकुळ तर्फ हेळवाक, तारळे, मारुल हवेली, काळगाव हे सात गट असून, कुंभारगाव, नाटोशी, मुरुड, कामरगाव, काळगाव, मारुल हवेली, तारळे, गोकुळ तर्फ हेळवाक, सणबूर, चाफळ, नाडे, मंद्रुणकोळे, म्हावशी, मल्हारपेठ हे १४ गण आहेत. २१ जागांसाठी ८३ उमेदवार इच्छुक आहेत.
कऱ्हाड तालुक्यात रेठरे बुद्रुक, मसूर, कोपर्डे हवेली, तांबवे, येळगाव, विंग, काले, वारुंजी, कार्वे, उंब्रज, पाल, सैदापूर हे १२ गट असून हजारमाची, चरेगाव, तळबीड, गोळेश्वर, कोयना वसाहत, कालडे, सैदापूर, पाल, उंब्रज, कार्वे, वारुंजी, काले, कोळे, सवादे, सुपने, वाघेरी, वडोली भिकेश्वर, शेरे, विंग, येळगाव, तांबवे, कोपर्डे हवेली, मसूर, रेठरे बु्रदुक हे २४ गण आहे. ३६ जागांसाठी १३३ उमेदवार इच्छुक आहेत. बुधवारी सातारा, पाटण व कऱ्हाड या तीन तालुक्यांतील एकूण ३३३ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे हेच नावे अंतिम करणार आहेत. संख्या मोठी असल्याने उमेदवारी देताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
नाव, गाव, मतदारसंघाची
लोकसंख्या अन बरंच काही
मुलाखतीसाठी नाव, गाव, मतदारसंघाची लोकसंख्या या प्राथमिक प्रश्नांसोबतच रामराजे नाईक-निंंबाळकर व आमदार शशिकांत शिंदे हे मधूनच एखादी अवघड प्रश्नाची गुगली टाकत होते, तेव्हा इच्छुकांची भंबेरी उडत होती.
सभापती पदांसाठी आरक्षण सोडत
सातारा जिल्ह्यातील ११ पंचायत समितींच्या सभापतीपदांची आरक्षण सोडत आज (दि. १९) रोजी दुपारी १ वाजता जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या उपस्थित होणार आहे. या सोडतीकडे जिल्ह्यातील इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे होते मुलाखतीला
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सलग तीन दिवस या मुलाखती सुरु होत्या. तिन्ही दिवस गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला.
अध्यक्षांचे नाव म्हणे शशिकांत शिंदे
मुलाखतीसाठी आलेल्या एकाला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचे नाव काय? असे विचारले असता त्याने उत्साहाच्या ओघात शशिकांत शिंदे असे सांगितले. त्यामुळे इच्छुकाला जिल्हाध्यक्षच कोण आहेत हे माहिती नाही, हे पाहून उपस्थितांनी कपाळावर हात मारुन घेतला.
बंडखोरीची भीती राष्ट्रवादीलाच
राष्ट्रवादीतर्फे इच्छुकांची संख्या मोठी आहेत. त्यातच राष्ट्रवादीने सर्वप्रथम मुलाखतींचा कार्यक्रम राबविला आहे. राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळालेले इतर पक्षांच्या वळचणीला जाण्याची शक्यता असल्याने बंडखोरीचा सर्वात जास्त धोका राष्ट्रवादीलाच आहे.
 

Web Title: Tai, Mai, Aaka ... the determination of the candidature is sure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.