घंटागाडी ठेकेदारावर कारवाई करा : जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:28 AM2021-05-29T04:28:52+5:302021-05-29T04:28:52+5:30
सातारा : घंटागाडी चालकांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे शुक्रवारी बहुतांश प्रभागातील कचरा संकलनाचा प्रश्न गंभीर बनला. त्यामुळे पालिका प्रशासनाने कराराचा ...
सातारा : घंटागाडी चालकांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे शुक्रवारी बहुतांश प्रभागातील कचरा संकलनाचा प्रश्न गंभीर बनला. त्यामुळे पालिका प्रशासनाने कराराचा भंग करणाऱ्या संबंधित घंटागाडी ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक विशाल जाधव यांनी केली आहे.
याबाबत मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. असे असताना पालिकेने नियुक्त केलेल्या घंटागाडी ठेकेदाराने चालकांचे वेतन रखडवून कराराचा भंग केला आहे. घंटागाडी चालकांनी शुक्रवारी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाचा फटका कचरा संकलनाला बसला. बहुतांश प्रभागात गाड्या न आल्याने कचरा घरातच पडून राहिला. पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, कचरा संकलन यामध्ये खंड पडू देऊ नये, प्रत्येक प्रभागात तातडीने औषध फवारणी करावी, अशी मागणी नगरसेवक विशाल जाधव यांनी केली आहे.