कऱ्हाडकर म्हणे.. नियम पाळून कारवाई करा!

By admin | Published: February 10, 2016 09:47 PM2016-02-10T21:47:22+5:302016-02-11T00:36:05+5:30

अतिक्रमणाबाबत आज निकाल : पालिका आणि हातगाडा संघटनेचा न्यायालयीन लढा; पालिकेने कारवाई थांबवली

Take action against kidnat .. | कऱ्हाडकर म्हणे.. नियम पाळून कारवाई करा!

कऱ्हाडकर म्हणे.. नियम पाळून कारवाई करा!

Next

कऱ्हाड : सर्वसोयी सुविधांनियुक्त असलेल्या कऱ्हाड शहरात रस्त्याकडेला अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या अतिक्रमणावर पालिकेकडून गेल्या आठ दिवसांपासून कारवाई केली. पालिकेकडून व्यावसायिकांचे अगोदर पुनर्वसन केले असते तर योग्य झाले असते. बेधडकपणे न्यायालयाच्या नियमांचे पालन न करता कारवाई केल्याने शहरातील हातगाडा संघटना न्यायालयात गेली. पालिकेने शहरातील अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा एकदा शहराने मोकळा श्वास घेतला. मात्र, यामध्ये एकीकडे व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे अतिक्रमणाची कारवाई ही योग्य असल्याचे कऱ्हाडकरांमधून मत व्यक्त केले जात आहे.
कऱ्हाड शहरात पालिकेच्या वतीने पहिल्यांदाच एवढी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली आहे. पालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. शहरातील रस्त्याकडेला असलेल्या फूटपाथवरून नागरिकांना देखील आता चालण्यासाठी जागा उपलब्ध झाली असल्याने याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे संघटना अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात आक्रमक झाली आहे. पालिकेकडून यापूर्वी करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी स्वत: संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही सहकार्य केले होते. मात्र, यावेळी करण्यात आलेली कारवाई ही नियमांच्या विरोधात असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शहरातील प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये सहभागी होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जाते. मग ती स्वच्छता मोहीम असो अथवा उत्सव, उपक्रम. यामध्ये शहरातील हातगाडाधारक व लोक शहरातील एक जबाबदार नागरिक म्हणून सहभागी होतात. मात्र, यावेळच्या कारवाईबाबत व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पालिकेच्या वतीने वीस कर्मचारी, तीन अभियंते, दोन ट्रॅक्टर, आरोग्य निरीक्षक तसेच जेसाबी, एक डंपर यांच्या साह्याने आतापर्यंत तीन झोपड्या, चाळीसहून अधिक खोकी तसेच वीसहून अधिक हातगाडे, अनधिकृतपणे लावण्यात आलेले फलक काढण्यात आले. त्यामध्ये व्यावसायिकांसह काही कुटुंबाचे नुकसानही झाले. याविरोधात सुरक्षा दल, भीमशक्ती संघटना तसेच झोपडपट्टी सुरक्षा संघटना, चारचाकी हातगाडाधारक संघटनेकडून पालिकेविरोधात मोर्चा, आंदोलनही काढण्यात आला. त्यास शहरातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. मात्र, दुसरीकडे याच व्यावसायिकांमुळे फूटपाथ, रस्त्याकडेला अतिक्रमण केले जात असल्याने नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. त्यातून पालिकेने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी, अशी नागरिकांकडूनही मागणी केली जात आहेत. सध्या करण्यात आलेली कारवाई ही योग्य असल्याचे नागरिकांतून सांगितले जाते.
पालिकेच्या वतीने तीन टप्यांत अतिक्रमण कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्याने पालिकेला ही मोहीम थांबवावी लागली आहे. (प्रतिनिधी)


पालिकेने पूर्वी संघटनेला सहकार्य करू असे सांगितले. त्यामुळे सुरुवातीला संघटनेतील व्यावसायिकांनीही पालिकेस सहकार्य करत आपली अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली. मात्र, पुन्हा पालिकेने सरसकट सर्वांचीच अतिक्रमणे काढल्याने संघटनेला न्यायालयात जावे लागले. कऱ्हाड शहरातील एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही स्वत:ला मानतो. त्याप्रमाणे पालिकेस यापूर्वी अनेकवेळा सहकार्यही केले आहे. मात्र, यावेळी पालिकेने चुकीच्या पद्धतीने ही कारवाई केली.
- जावेद नायकवडी
तालुकाध्यक्ष, हॉकर्स संघटना, कऱ्हाड

कऱ्हाड शहरात पालिकेकडून राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम ही योग्यच आहे. मात्र दुसरीकडे पालिकेने ही कारवाई करण्यापूर्वी व्यावसायिकांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. त्यांचे पुनर्वसन केले असते तर आज व्यावसायिकांचे नुकसान झाले नसते.
-सागर बर्गे
शहराध्यक्ष, मनसे, कऱ्हाड

Web Title: Take action against kidnat ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.