निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:38 AM2021-04-21T04:38:49+5:302021-04-21T04:38:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध ...

Take action if people are moving around despite restrictions | निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर कारवाई करा

निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर कारवाई करा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशांवर कारवाई करून शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी मंळवारी पोलीस विभागाला केल्या.

गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी मंळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विभागीय परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. पोलीसही बाधित होत आहेत. या बाधित पोलीसांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी कोविड सेंटर सुरू करा, अशा सूचना करून देसाई पुढे म्हणाले, यासाठी स्थानिक आमदारांची मदत घ्या. तसेच जिल्हा नियोजनामधूनही निधी देण्यात येईल. बाजारपेठांमधील गर्दी हटविण्याचे काम पोलीस करीत आहेत. यासाठी महानगरपालिकांचे कर्मचारी, नगर परिषदांचे कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Web Title: Take action if people are moving around despite restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.