वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 03:35 PM2023-06-10T15:35:05+5:302023-06-10T15:36:11+5:30

लोणंद-फलटण पालखी मार्गाची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून पाहणी

Take care not to inconvenience the visitors, Public Works Minister's directive to the administration | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

googlenewsNext

सातारा : सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद ते फलटण मार्ग तसेच पालखी स्थळांची पाहणी केली. यावेळी वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

यावेळी चव्हाण म्हणाले, सध्या उन्हाळ्याची परिस्थिती पाहता पालखी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांना पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व विसाव्याच्या ठिकाणी मंडप उभे करावे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये म्हणून टँकरची संख्या वाढवावी. पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा पुरेशा औषध साठ्यांसह सज्ज ठेवावी. पालखी मार्गातील रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजवावे. जागोजागी विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश मंत्री चव्हाण यांनी दिले.

Web Title: Take care not to inconvenience the visitors, Public Works Minister's directive to the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.