वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

By Admin | Published: June 24, 2017 04:59 PM2017-06-24T16:59:35+5:302017-06-24T16:59:35+5:30

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटण तालुका प्रशासन सज्ज

Take care that the Warkaris will not be inconvenienced: District Collector's notice | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत

फलटण , दि. २४ : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या सातारा जिल्ह्यातील वास्तव्यादरम्यान शासकीय यंत्रणेच्या प्रत्येक विभागाने स्वच्छता, पाणी, आरोग्य, रस्ते, वीज, इंधन पुरवठा आदी महत्वपूर्ण बाबींमध्ये कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत दक्ष रहावे, अशी सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केली.
दरम्यान, त्यांनी शासकीय यंत्रणांनी आपापसात ताळमेळ राखत या सोहळ्यात सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांसाठी कार्यरत रहावे, असेही सांगितले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तालुक्यातील दि. २५ ते २७ जून या कालावधीतील वास्तव्यादरम्यान वारकऱ्यांना शासकीय यंत्रणेतील प्रत्येक विभागाने कशा पध्दतीने सेवा व सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले आहे. याचा पुर्नआढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सिंघल यांनी फलटणला भेट देत आवश्यक सूचना करीत मार्गदर्शन केले.

पालखी मागार्चा रस्ता व तेथील साईडपट्या सुस्थितीत करणे आवश्यक असून वारकऱ्यांचे शिधा, साहित्य, प्रवासी वाहने व पाण्याचे टँकर आदी वाहने ही पालखी सोहळा तळावर पोहोचण्यापूर्वीच मार्गस्थ करावीत. जेणे करुन वाहनांना गदीर्तून मार्गक्रमण करावे लागणार नाही. त्याचप्रमाणे तरडगाव येथील उड्डाण पुलाजवळ पत्रे लावले जातात. हे अतिशय धोकादायक असून तेथे योग्य त्या उपाय योजना संबंधित विभागाने तातडीने कराव्यात अशा सूचना देत जिल्हाधिकारी सिंघल यांनी पालखी तळावर निर्मलवारीसाठी नियोजितरित्या टॉयलेट, लाईटची व्यवस्था असावी. पालखी सोहळा येण्यापूर्वी व गेल्यानंतर पालखी तळ व त्या-त्या गावांमध्ये साफसफाईची दक्षता घेणे गरजेचे आहे. पोलिस विभागाने पयार्यी वाहतूक मागार्चे नियोजन करुन एकेरी वाहतूक, दुहेरी वाहतूक यांचे नियोजन बांधकाम विभागाचे सहकायार्ने करावे असे सांगितले.

संपूर्ण पालखी सोहळ्यात आरोग्य विभाग हा अतिशय महत्वाचा विभाग असून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वच्छता व आरोग्य याबाबत काटेकोरपणे नियोजण करावे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून जे पाणी पिण्यास अयोग्य आहे. त्याठिकाणी ठळक सूचना लिहिलेले फलक लावावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. अधिकराव पाटील यांनी जिल्ह्यातील पालखी मार्गावर ५ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून याद्वारे कॅम्पचे आयोजन, ४९ डॉक्टर्सची टिम, त्यांच्याबरोबर रुग्णवाहिका, पुरेसा औषधसाठा, प्रथमोपचाराची साधने आदींची व्यवस्था केली असल्याचे स्पष्ट केले.

तालुक्यात एकूण ५४ किलो मिटरचा पालखी मार्ग असून या मार्गावरील झाडे, झुडपे काढून साईडपट्यांसह रस्ते पूर्ण केले जातील. पुलाचे कठडे, गार्डस्टोन रंगविले जातील व प्रत्येक ५ किलो मिटरवर एक जेसीबी व एक क्रेनसह सहा ते सात मजुरांसह एक जीप तैनात ेकेली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

पाण्याचे टँकर भरणाऱ्या पॉर्इंटसची माहिती देवून वारी पुढे गेल्यानंतरची स्वच्छतेची दक्षता घेतली जाईल. त्याचप्रमाणे पालखीतळावर दर्शनबारीसाठी बॅरिकेटस, जनरेटर्स, शौचालये आदींची चोख व्यवस्था केली जाईल, असे फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी सांगितले.

महावितरणकडून वीज पुरवठा अखंडित ठेवण्याची ग्वाही देत संबंधित अधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे जिल्ह्यातील तीन मुक्काम फलटण विभागात येतात. प्रत्येक मुक्कामी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केली आहे. तसेच नियंत्रण पथक, पालखी तळावर कंट्रोल रुम शिवाय शेती वाहिनी व गावठाण वाहिनींवरुन विद्युत पुरवठ्याची सोय २४ तास उपलब्ध करुन देण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Take care that the Warkaris will not be inconvenienced: District Collector's notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.