कोरोना प्रतिबंधात्मक लस ताबडतोब घ्या : प्रसाद काटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:37 AM2021-03-10T04:37:55+5:302021-03-10T04:37:55+5:30
फलटण : साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील इतर व्याधी असलेल्या नागरिकांनी तातडीने कोरोना लस घ्यावी, असे आवाहन ...
फलटण : साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील इतर व्याधी असलेल्या नागरिकांनी तातडीने कोरोना लस घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आपल्या घरातील कोणी व्यक्ती ६० वर्षे वयावरील असतील त्यांना कोणत्याही अटीविना कोरोना प्रतिबंधात्मक लस विना मोबदला देण्यात येत आहे. ज्या व्यक्तींचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त आहे व ज्यांना मधुमेह, रक्तदाब इतर कोणता त्रास असेल, अशा व्यक्तींनीही कोरोना लस घ्यावी.
फलटण नगरपरिषदेच्या वतीने शंकर मार्केट येथील शाळा नंबर १ येथे नगरपरिषदेच्या दवाखान्यामध्ये लस देण्याची व्यवस्था उपलब्ध केली आहे. संबंधित ठिकाणी गर्दी झाली तर अजून एक किंवा दोन ठिकाणी लसीकरणासाठी नवीन केंद्र उपलब्ध करून दिली जातील, असेही प्रसाद काटकर यांनी पत्रकात नमूद केले आहे.