श्रेय जरून घ्या; पण तुम्ही केलेल्या कामाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:43 AM2021-09-22T04:43:21+5:302021-09-22T04:43:21+5:30
खटाव : नागरी सुविधांतर्गत ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या जनसुविधांसाठी विशेष अनुदान आमदार फंडातून मंजूर करण्याचे काम खटावमध्ये केले, तर न केलेल्या ...
खटाव : नागरी सुविधांतर्गत ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या जनसुविधांसाठी विशेष अनुदान आमदार फंडातून मंजूर करण्याचे काम खटावमध्ये केले, तर न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे काम मात्र चलाखीने विरोधकांनी केले. कोणत्याही कामाचे श्रेय घ्या; पण ते स्वतः केलेले काम असेल तर, अशी खोचक टीका आमदार महेश शिंदे यांनी केली.
खटावमध्ये आमदार महेश शिंदे यांच्या निधीतून, तसेच राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, राहुल पाटील, अशोक कुदळे, ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडगे, राहुल जमदाडे आदी उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, ‘विकासासाठी नेहमी मी कटिबद्ध आहे. खटावमधील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी असणारी मागणी व त्याला लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच असतात. विविध विकासकामांसाठी आमदार फंडातून मंजूर झालेल्या निधीचे श्रेय जिल्हा परिषद सदस्यांनी नारळ फोडून घेऊ नये. खटावमधील वाणी समाजाच्या स्मशानभूमीच्या वॉलकंपाउंडकरिता चार लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.’
राहुल पाटील म्हणाले, ‘निवडणुका जवळ आल्या की विरोधकांना कोणत्याही कामाचे श्रेय घेण्याची गडबड होते; परंतु ती कामे कोणी मंजूर केली याचे कागदोपत्री पुरावे न बघताच दिशाभूल करण्याची कामे सध्या सुरू आहेत. आमदारांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय विरोधकांनी घेण्यापेक्षा दुसऱ्या विकासकामांसाठी आपली ताकत लावावी.’
गजानन टकले, दीपक झिरपे, राजेंद्र झिरपे, रमेश सवानद, डॉ. राजेंद्र सवानंद, बंडा इगवे, संजू टकले, चंद्रकांत टकले, सर्वेश पवार, नीलेश भोसरकर, नितीन इगावे, विशाल देशमुख, दीपक विधाते, विकास कुंभार, रमेश शिंदे, ताईमुर मुल्ला, अर्जुन पाटोळे, कल्याण बोर्गे उपस्थित होते.
फोटो २०खटाव-महेश शिंदे
खटावमध्ये वाणी समाजाच्या स्मशानभूमीच्या वॉलकंपाउंडचे भूमिपूजन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राहुल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)