करिअर निवडताना जिज्ञासू दृष्टिकोन ठेवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:13 AM2021-03-04T05:13:59+5:302021-03-04T05:13:59+5:30
येथील सुजित सतीश देशमुख या विद्यार्थ्याने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कृषी ...
येथील सुजित सतीश देशमुख या विद्यार्थ्याने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कृषी हवामान शास्त्र या विषयात राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. या यशाबद्दल त्याचा सत्कार खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, शैक्षणिक बाबतीत उज्ज्वल यश संपादन करणारा सुजित उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने बास्केटबॉल आणि तायक्वांदो या खेळात राज्यस्तरावर यश संपादन केले असून, शिक्षण, व्यायाम आणि खेळ याचा सुरेख संगम सुजितने साधला आहे.
सुजित हा हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश देशमुख यांचा मुलगा आहे. गतवर्षी आयसीएआर-दिल्ली मार्फत घेतलेल्या नेट परीक्षेत उत्तीर्ण होणारा तो महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल सुजितचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
- कोट
नवीन संशोधनाची संकल्पना करताना बदलत्या हवामानाबद्दल अत्याधुनिक संशोधन करून पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. तसेच दुष्काळी व ग्रामीण भागतील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रयोग राबवून शेतकऱ्यांना योग्य ती मदत करणार आहे.
- सुजित देशमुख
फोटो : ०३केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाड येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सुजित देशमुखचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सतीश देशमुख उपस्थित होते.