डॉक्टरांनाही लळा ‘खाकी’चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:03 PM2018-04-11T23:03:39+5:302018-04-11T23:03:39+5:30

Take the doctor also 'Khki' | डॉक्टरांनाही लळा ‘खाकी’चा

डॉक्टरांनाही लळा ‘खाकी’चा

Next

स्वप्नील शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : तरुणांमध्ये नेहमीच खाकी वर्दीचे आकर्षण असते. याला आता डॉक्टरही अपवाद राहिले नाहीत. पोलीस दलात सध्या बीएएमएस, बीएचएमएस, बीडीएस असे उच्च शिक्षण झालेले डॉक्टर कार्यरत असून, जिल्हा पोलीस दलाची मान या अधिकाऱ्यांमुळे आणखीनच उंचावली आहे.
पोलीस शिपाई असो वा अधिकारी या पदांसाठी उच्चशिक्षित तरुणांची गर्दी असते. त्यामध्ये बीए, एमए, एमकॉम, एमएसस्सी, इंजिनिअर, वकील यांचा प्रामुख्याने समावेश असतो. मात्र, सातारा जिल्हा पोलीस दलात सध्या काम करणारे अधिकारी हे चक्क डॉक्टर आहेत. डॉक्टर हा पेशा आरामदायी, प्रतिष्ठेचा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना आयपीएस पवन बनसोड, डीवायएसपी खंडेराव धरणे आणि पीएसआय पूजा शहा या तीन अधिकाºयांनी पोलीस खात्यातील आव्हानात्मक नोकरी स्वीकाली आहे. पोलीस दलात स्वत:ची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. यापूर्वीही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख हेही डॉक्टर होते.
परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी शरद पवार डेन्टल कॉलेज, नागपूर येथून बीडीएस शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना पंतप्रधान फेलोशीपसाठी आसाम राज्यात ग्रामीण विकास या विषयावर तीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळीच यूपीएससी परीक्षेची त्यांनी तयारी केली. २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांची आयपीएसपदी निवड झाली. सध्या ते साताºयात आपली सेवा बजावत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे यांनी पोदार मेडिकल कॉलेज, मुंबई येथून बीएएमएस (आयुर्वेदिक) शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच प्रशासनात काम करण्याची त्यांची इच्छा होती. मेडिकलच्या शेवटच्या वर्षात असताना २००९ मध्ये एमपीएससीची जाहिरात सुटली. यावेळी अर्ज करून अभ्यासाची तयारीस सुरुवात केली आणि पहिल्याच प्रयत्नात ते पास झाले. सध्या ते सातारा विभागात उपअधीक्षक म्हणून काम करीत आहेत.
पोलीस उपनिरीक्षक पूजा शहा यांनी बीएचएमएसनंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इन मेडिसीनचे शिक्षण पूर्ण केले. दोन वर्षे सातारा शहरात डॉक्टरची प्रॅक्टीसही केली. दरम्यान, त्यांना प्रशासकीय सेवेचे आकर्षण निर्माण झाल्याने त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. २०१३ मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्या राज्यात महिलांमध्ये पंधराव्या आल्या. सध्या त्या सातारा पोलीस मुख्यालयात पोलीस उपनिरीक्षकपदी सेवा बजावत आहेत.

मेडिकल क्षेत्राची व्यक्ती पोलीस खात्यात आल्यामुळे लोकाशी सहज समरस होत असते. संवाद कौशल्य चांगले असल्यामुळे मेडिकल अँगलने त्यांना तपास चांगला करता येतो. त्यामुळे गुन्ह्याचा उलगडा होण्यासाठी मदत होत असते.
-डॉ. पवन बनसोड, आयपीएस अधिकारी

डॉक्टर पेशातील व्यक्ती पोलीस दलात असल्यामुळे खून, अपघात आणि इतर महत्त्वाच्या घटनांमध्ये शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक रिपोर्ट येण्यापूर्वी पटकन अंदाज बांधता येतो. तसेच तपासाला दिशा मिळणाचे मदत होत असते.
-डॉ. खंडेराव धरणे,
उपविभागीय पोलीस अधिकारी

गुन्ह्याचा तपास करताना नेहमी डॉक्टरच्या दृष्टिकोनातून पाहत असते. आरोपी व तक्रारदार यांच्याकडे माणूस म्हणून पाहिले जाते. मेडिकलमध्ये फॉरेन्सिक विषय असल्याने तपास करत असताना इतरांच्या तुलनेत घटनेचे जलद आकलन होत असते.-डॉ. पूजा शहा,

Web Title: Take the doctor also 'Khki'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.