अनाथ मुलींच्या शिक्षणाचा घेतला वसा- दत्तात्रय सावंत यांनी २५ वर्षांत शिकवली १३० मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 07:03 PM2019-11-02T19:03:58+5:302019-11-02T19:04:04+5:30

दत्तात्रय सावंत यांना २५ वर्षांपूर्वी एकुलता एक मुलगा अकाली सोडून गेला. त्यानंतर समाजातील अनाथ, गरीब विशेषत: मुलींना शिकवून त्यांना ताठ मानेने स्वत:च्या पायावर उभे करण्याचा वसा घेतला.

 Take the education of orphan girls | अनाथ मुलींच्या शिक्षणाचा घेतला वसा- दत्तात्रय सावंत यांनी २५ वर्षांत शिकवली १३० मुली

अनाथ मुलींच्या शिक्षणाचा घेतला वसा- दत्तात्रय सावंत यांनी २५ वर्षांत शिकवली १३० मुली

Next
ठळक मुद्दे मजुराची ही कहाणी ।

पांडुरंग भिलारे ।

वाई : धकाधकीच्या गतिमान युगात सर्वजण व्यावहारिक विचार करताना दिसत आहेत. सामाजातील तसेच रक्ताच्या नात्यातील माणुसकी लोप पावत असताना दत्तात्रय सावंत यांच्यासारखी देवदूत माणसं याला अपवाद ठरत आहेत़ त्यांनी २५ वर्षांत तब्बल १३० अनाथ, गरीब मुलांना शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले.

दत्तात्रय सावंत यांना २५ वर्षांपूर्वी एकुलता एक मुलगा अकाली सोडून गेला. त्यानंतर समाजातील अनाथ, गरीब विशेषत: मुलींना शिकवून त्यांना ताठ मानेने स्वत:च्या पायावर उभे करण्याचा वसा घेतला. स्वत: अल्पशिक्षित व शेतीही नसल्याने सेंट्रिंगची कामे करून या मुलांचे राहणे व शिक्षणाचा खर्च करत असतात. या कामात त्यांच्या पत्नी मालन यांनीही समर्थ साथ दिली. सर्व मुलांमध्ये काकी या नावाने परिचित होत्या; पण दोन वर्षांपूर्वी त्यांचाही मृत्यू झाला़ आत्ता मुलांची आई आणि वडील म्हणून तेच जबाबदाऱ्या पार पाडू लागले. त्यांच्याकडे सातारा, पुणे, लातूर, नांदेड, जळगाव, ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी येत आहेत़ आताही त्यांच्याकडे ३२ मुली असून, आठ ते दहा मुली त्यांच्या घरी वास्तव्यास आहेत. बाकीच्या कोल्हापूर, कºहाड व वारणानगरला शिक्षण घेत आहेत़

तीन मुली वकील तर पाच मुली डॉक्टर
दत्तात्रय सावंत यांनी तीन मुलींना वकील केले, पाचजणींना डॉक्टर बनविले आहे. बारा प्राध्यापिका, आठ प्राथमिक शिक्षिका, साठ मुली विविध शाखेतून इंजिनिअर केले तसेच अनेकांना पदवीधर केले आहे़ हे सर्व करीत असताना त्यांनी विविध बँका, पतसंस्थांमधून अनेकदा कर्ज काढले. एक स्वत:च्या मालकीचा बंगला विकला; पण मुलींच्या शिक्षणात बाधा येऊन दिली नाही़ त्यांनी आतापर्यंत शिक्षण पूर्ण झालेल्यापैकी २२ मुलींचे कन्यादान करून दिले आहे़ २१ मुलींनी कर्माने बाप असणाºया बापूंचे नाव वडील म्हणून लावले असल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार मिळाले आहेत.

दत्तात्रय सावंत यांचे अनाथ, गरीब मुली, मुले यांना सहारा देऊन शिक्षण देऊन सक्षम करण्याचे कार्य २५ वर्षे सुरू आहे. आम्ही नवप्रकाश मंडळातर्फे त्यांच्या विधायक कार्यास सहकार्य केले आहे.
- विनोद सकुंडे, गंगापुरी, वाई

चंद्रकांत जाधव हा एकमेव मुलगा पीएचडी करण्यासाठी अमेरिकेला जात आहे. त्याला राज्य शासनाची स्कॉलरशीप मिळाली. त्यांना पाठविण्यासाठी लागणारा साडेतीन लाख खर्च गोळा करत आहे.
- दत्तात्रय सावंत, सातारा
 

Web Title:  Take the education of orphan girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.