पर्यावरण प्रियतेचा फलटणला लळा !

By admin | Published: February 8, 2016 10:38 PM2016-02-08T22:38:05+5:302016-02-08T23:48:30+5:30

यशवंत डांगे : स्वच्छ, सुंदर, हरित, प्लास्टिक मुक्तीसाठी पालिकेचा पुढाकार

Take the electrification of the environment! | पर्यावरण प्रियतेचा फलटणला लळा !

पर्यावरण प्रियतेचा फलटणला लळा !

Next

फलटण : ‘फलटण शहर स्वच्छ, सुंदर, हरित, प्लॅस्टिकमुक्त, हागणदारी मुक्त आणि पर्यावरण प्रिय शहर बनविण्यासाठी फलटण पालिकेने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ठोस कार्यक्रम राबविला आहे. त्यामुळे शहरातील सर्व घटकांचा पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र योजनेला प्रतिसाद लाभत आहे,’ अशी माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली. फलटण शहरातील सर्व माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापकांसमवेत नगर परिषदेच्या संजीवराजे नाईक-निंबाळकर सभागृहात आयोजित शहर स्वच्छ, सुंदर, हरित, प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या योजनेसंबंधी आयोजित बैठकीत ते बोलत होते. शहरातील नागरिक, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स, वकील व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीरितीने राबविण्यात येत आहे. दररोज सुमारे तेरा टन ओला व सुका कचरा घंटागाडीद्वारे शहरातून संकलित करून त्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून दररोज उपलब्ध होणाऱ्या सुमारे दोन ते अडीच टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची खत निर्मिती करण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील सुमारे १२ हजार कुटुंबांना दोन डस्टबीन विविध संस्था/व्यक्तींच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याद्वारे घरातील ओला व सुका कचरा वेगळा साठवून तो घंटागाडीत देण्याचे आवाहन करण्यात आल्याचे मुख्याधिकारी डांगे यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिले. फलटणची बाजारपेठ दिवसेंदिवस विस्तारत आहेत. याठिकाणी प्रत्येक वस्तू खरेदी करताना प्लाटिक पिशव्यांचा आग्रह धरला जात आहे. प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे नगर परिषदेने पर्यावरण अधिनियमाअंतर्गत शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लॅस्टिक पिशवी वापरण्यावर असलेले निर्बंध शहरवासीय तसेच व्यापारी, हातगाडीवाले, कापड दुकानदार, फळविक्रेते यांच्या निदर्शनास आणून देऊन प्लॅस्टिक पिशवी न वापरण्याचे आवाहन केले. कोणत्या ग्राहकांनी पिशव्यांची मागणी केली तरी व्यापाऱ्यांनी नम्रपणे देणार नसल्याचे सांगावे.
त्यांना कायद्यातील तरतुदीनुसार कापडी पिशवी घेऊन ग्राहकाला उपलब्ध करून देण्याच्या तरतुदीची माहिती देण्यात आली. या योजनेला यश मिळण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. (प्रतिनिधी)


उत्तेजनार्थ बक्षीस योजना
शहरात कचरा निर्मूलन, २ हजार व १ हजार रुपयांची रोख बक्षिसे व सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देण्याचे निश्चित करण्यात आले .त्याचबरोबर प्रत्येकी पाचशे रुपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येणार आहेत. या शालेयस्तरावरील स्पर्धांसाठी नगर परिषदेच्या वतीने चित्रकला साहित्य पुरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रत्येक शाळेतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांसाठी शहरस्तरावर एक चित्रकला स्पर्धा घेऊन त्यासाठी प्रत्येकी १० हजार, ७ हजार, ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे आणि स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.


रोज निघणार प्रभातफेरी

दरम्यान, पर्यावरण रक्षण आणि स्वच्छता याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी शहरातील प्रत्येक शाळेने दररोज एक याप्रमाणे आगामी महिनाभर शहरातून प्रभात फेरी काढण्याचे तसेच दररोज सकाळी प्रार्थनेनंतर पर्यावरण विषयक प्रतिज्ञा सर्व शाळांमधून घेण्याचे निश्चित करण्यात आले.

Web Title: Take the electrification of the environment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.