तळहिरा तलाव अद्याप अर्ध्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:45 AM2021-08-20T04:45:41+5:302021-08-20T04:45:41+5:30

वाठार स्टेशन : राज्यभर दाखल झालेला पाऊस यंदा कायम दुष्काळी भाग असलेल्या कोरेगाव तालुक्यात चांगलाच बरसला. असे असले तरी ...

Talhira Lake still halfway there! | तळहिरा तलाव अद्याप अर्ध्यावरच!

तळहिरा तलाव अद्याप अर्ध्यावरच!

Next

वाठार स्टेशन : राज्यभर दाखल झालेला पाऊस यंदा कायम दुष्काळी भाग असलेल्या कोरेगाव तालुक्यात चांगलाच बरसला. असे असले तरी या भागातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची, तसेच शेतीसाठी वरदान ठरलेला तळहिरा तलाव मात्र अजूनही अर्ध्यावरच राहिला आहे. हा तलाव शंभर टक्के भरण्यासाठी अजून भरपूर पावसाची गरज आहे.

वसना नदीपात्राच्या पूर्वेकडील तळिये बिचुकले गावाच्या मधोमध तळहिरा ओढ्यावर देऊर गावाजवळ असलेला हा तलाव सलग तीन वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र, हा तलाव शंभर टक्के भरण्यासाठी या भागात पडत असलेला पूर्व मान्सून पाऊस अपुरा असल्याने हे धरण आता पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी परतीच्या मान्सून पावसाची गरज आहे. त्यामुळे यंदा ही हे धरण याच पावसात भरेल, अशी या भागातील शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

१९वाठार स्टेशन

फोटो अर्धवट भरलेला तळहिरा पाझर तलाव.

Web Title: Talhira Lake still halfway there!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.