सातारा मिलिटरी कँटीनचे तालुकानिहाय नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:23 AM2021-03-30T04:23:23+5:302021-03-30T04:23:23+5:30
सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सातारा मिलिटरी कँटीनमध्ये विविध तालुक्यातील कार्डधारकांसाठी दिवस ठरवून दिले आहेत. त्यानुसार संबंधितांना प्रवेश मिळणार ...
सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सातारा मिलिटरी कँटीनमध्ये विविध तालुक्यातील कार्डधारकांसाठी दिवस ठरवून दिले आहेत. त्यानुसार संबंधितांना प्रवेश मिळणार आहे,’ अशी माहिती व्यवस्थापक, निवृत्त कमांडर राजेंद्र शिंदे यांनी दिली.
मिलिटरी कँटीन १ ते ३ एप्रिलपर्यंत स्टॉक टेकिंग तर २ एप्रिलला गुडफ्रायडे निमित्त बंद राहील. तर कँटीन पूर्णत: कॅशलेस झाले आहे. फक्त कार्ड पेमेंट स्वीकारले जाणार आहे तर ४ ते १० एप्रिल हे दिवस सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई आणि महाड तालुक्यांसाठी आहेत. ११ ते १७ एप्रिल कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर, महाबळेश्वर तर १८ ते २४ एप्रिल हे सातारा, कऱ्हाड, पाटण, वाई, जावळी आणि महाडसाठी आहेत. त्याचबरोबर २४ ते २८ एप्रिलपर्यंतचे दिवस हे कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर आणि महाबळेश्वर तालुका तर २९ व ३० एप्रिल हे दिवस वरील तारखेस न आलेल्या सर्व कार्डधारकांसाठी आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
.............................................................