विधवा प्रथा बंदी: तांबवे ठरली सातारा जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत, स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून गावाची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 04:57 PM2022-05-20T16:57:13+5:302022-05-20T17:01:49+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीच्या कौतुकाचा ठरावही करण्यात आला.

Tambwe Gram Panchayat in Satara district has passed a resolution banning widowhood | विधवा प्रथा बंदी: तांबवे ठरली सातारा जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत, स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून गावाची ओळख

विधवा प्रथा बंदी: तांबवे ठरली सातारा जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत, स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून गावाची ओळख

googlenewsNext

तांबवे : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीच्या निर्णयानंतर सातारा जिल्ह्यातील तांबवे या गावाने विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर केला आहे. स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून तांबवे गावाची ओळख आहे. जिल्ह्यात विधवा प्रथा बंदीचा ठराव करण्याचा पहिला मान तांबवे गावाने मिळविला आहे.

तांबवे ग्रामपंचायतीने आज, शुक्रवारी झालेल्या मासिक सभेत हा ठराव केला. उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील यांनी ठराव मांडला, त्यास सदस्य जयश्री कबाडे यांनी अनुमोदन दिले आहे. यावेळी सदस्यांनी एकमताने ठरावास मंजुरी दिली. त्याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा घेतलेल्या ठरावाबद्दल कौतुकाचा ठरावही करण्यात आला.

तांबवे ग्रामपंचायतीच्या ठरावात म्हटले आहे की, आपल्या समाजात पतीच्या निधनावेळी अंत्यविधीच्या वेळी, पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, तसेच महिलाला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे.

या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे, म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे, तरी आपल्या गावामध्ये व देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे. याकरिता विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. या संदर्भात गावामध्ये जनजागृती करण्यात यावी, त्यास या सभेची मंजुरी आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे हा ठराव करुन पहिले क्रांतिकारक पाऊल टाकले होते. याची दखल घेत राज्य सरकारने याचे अनुकरण करत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेच्या उच्चाटनाचे ठराव करावेत अशा सूचना दिल्या आहेत. त्याचे अनुकरण आता सर्वत्र होऊ लागले आहे.

Web Title: Tambwe Gram Panchayat in Satara district has passed a resolution banning widowhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.