शिक्षक संघाचे ‘पुस्तक’ बरबटलेले: फडतरे

By admin | Published: June 18, 2015 10:08 PM2015-06-18T22:08:19+5:302015-06-19T00:21:34+5:30

चारजणांची उमेदवारी मागे.

Teacher's book 'Broken': Strike | शिक्षक संघाचे ‘पुस्तक’ बरबटलेले: फडतरे

शिक्षक संघाचे ‘पुस्तक’ बरबटलेले: फडतरे

Next

सातारा : ‘संघाची बँकेच्या कारकिर्दीची पुस्तके आॅडिटमधील ताशेरे, जमेल तेथे दरोडे आणि लुटमारांनी भरलेली आहेत,’ असा आरोप शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल फडतरे यांनी केला.रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे प्रगती पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. समितीचे राज्य सरचिटणीस उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष शंकर देवरे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष विठ्ठल माने, उपाध्यक्ष विजय जाधव, प्रदीप कदम, विनोद मोरे, सुरेश पवार, रमेश माने, संतोष घाडगे, उमेदवार संतोष मांढरे, रणजित शिंदे यांची प्रमुख उपस्थित होती.फडतरे म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत समितीच्या संचालक मंडळावर शासकीय लेखा परीक्षणात एकही ताशेरा ओढण्यात आला नाही. रिझर्व्ह बँकेनेही बँकेच्या कामकाजाचे कौतुक केले आहे. पुस्तके उपाध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र सॅलरी ओनर्स असोसिएशनचे बँकेच्या कामकाजास एकदा नव्हे, दोनदा पुरस्कार देऊन गौरविले आहे, असे असताना घोटाळ्यांचा आरोप करणे हास्यास्पद आहे.विठ्ठल माने, उदय शिंदे यांनी बँकेची नफास्थिती, व्यवस्थापन खर्च, कायम ठेवीवरील व्याज याबाबी सभासदांसमोर मांडल्या.प्रदीप कदम यांनी प्रास्ताविक केले. बी. एस. साबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


चारजणांची उमेदवारी मागे...
जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रगती पॅनेलला पाठिंबा देत चार उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेऊन शिक्षक बँकेच्या प्रगतिशील कारभाराला समर्थन देण्याचा निर्णय पत्रकाद्वारे जाहीर केला आहे. त्यामध्ये परळी मतदार संघामधून महेश वंजारी, महिला राखीव गटातून संध्या बोबडे, इतर मागास प्रवर्गातून सचिनकुमार गाढवे व प्रदीप नीळकंठ यांचा समावेश आहे. त्यांनी समर्थन देत असल्याचे पत्रकाद्वारे कळवून समितीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे, अशी माहिती शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल फडतरे यांनी दिली.

Web Title: Teacher's book 'Broken': Strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.