काम करूनही शिक्षकांना मिळेना दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:37 AM2021-05-16T04:37:22+5:302021-05-16T04:37:22+5:30

सातारा : अध्यापनाशिवाय कोरोना संकटात शिक्षकांना अनेक शासकीय कामांमध्ये समाविष्ट करून घेतले होते. मात्र, याच संकटकाळात त्यांचा हक्काचा पगार ...

Teachers don't get paid even after working | काम करूनही शिक्षकांना मिळेना दाम

काम करूनही शिक्षकांना मिळेना दाम

Next

सातारा : अध्यापनाशिवाय कोरोना संकटात शिक्षकांना अनेक शासकीय कामांमध्ये समाविष्ट करून घेतले होते. मात्र, याच संकटकाळात त्यांचा हक्काचा पगार अडकवून ठेवण्यात येत आहे. डिसेंबरपासून पगार महिना महिना विलंबाने मिळत असल्याने शिक्षकांची आर्थिक घडी विस्कटू लागली आहे. येणाऱ्या पगारातून केलेले हप्त्यांचे नियोजन कोलमडल्याने शिक्षकांची चिंता वाढली आहे.

कोरोनामुळे शाळा बंद असताना शिक्षकांना पूर्ण पगार मिळतोय, अशी ओरड अनेक जण करतात. प्रत्यक्षात मात्र शाळेतील अध्यापनानंतर शिक्षकांना शासनाच्या विविध कामांमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले होते. राज्य शासनाने शिक्षकांचा पगार महिन्याच्या १ तारखेलाच बँक खात्यात जमा करावा, असा शासन निर्णय आहे. मात्र, पाच वर्षांत एकदाही १ तारखेला पगार जमा झालेला नाही, असं शिक्षक सांगतात. जिल्हा परिषदेची यंत्रणा पंचायत समितीच्या कारभारावर बोट ठेवते तर जिल्हा कोषागार कार्यालय जिल्हा परिषदेच्या उदासीनतेकडे लक्ष वेधते. शिक्षकांच्या संघटना, महिनाभरापासून या सर्वांचा पाठपुरावा करत राहतात. मात्र, संबंधित टेबलवरून केवळ टोलवाटोलवी केली जाते.

शिक्षकांना गच्च पगार आहे, त्यांना नाही पगार मिळाला तर काय फरक पडतो, अशी साधारण भावना सामान्यांच्या मनात असते. मात्र, आर्थिक उत्पन्नाच्या आधारावर कुटुंबाच्या खर्चांचे नियोजन केलेले असते. अचानक उत्पन्न कमी झालं तर येणारे खर्च आणि भरायला लागणारे हप्ते यांचा ताळमेळ बसत नाही. परिणामी हप्ते आणि व्याज दोन्ही वाढत राहतात. पडेल ते काम करण्याची भूमिका घेतलेल्या शिक्षकांचा पगार वेळेत काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चौकट :

शाईची प्रत घालतेय घोळ

शिक्षकांच्या पगाराचे वंटन शासनाकडून पुण्यात आणि तेथून जिल्हा पातळीवर येते. पगारासाठी पुण्यातून मूळ शाईची प्रत कोषागारात आणणे बंधनकारक आहे. सध्या लॉकडाऊनमुळे ही प्रत आणताना उशीर होत आहे. त्यामुळे पगार चक्क दोन-दोन महिने उशिराने होत असल्याचे दिसते.

कोट :

- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा

पॉइंटर

जिल्ह्यातील एकूण जि. प. शाळा :

जिल्हा परिषदेचे एकूण शिक्षक :

कोट

उशिरा वेतनाने बिघडवले आर्थिक गणित

१.

ट्रेझरीमध्ये बराच वेळ वाया जातो. महसूल कर्मचाऱ्यांना तीन दिवसांत जीपीएफ मिळतो तर शिक्षकांना का नाही? सीएमपी प्रणाली तातडीने लागू करून शिक्षकांचे आर्थिक शोषण थांबवावे.

- राजेश बोराटे, इब्टा संघटना

२.

पगार उशिरा होत असल्यामुळे गृहकर्जाचे हप्ते, पतपेढी, एलआयसीचे हप्ते प्रभावित होतात. चेक बाऊन्स होऊन चक्रवाढ पद्धतीने व्याजाचा शिक्षकांवर भुर्दंड पडतो. या चक्रात अडकल्याने शिक्षक खचत आहे.

- प्रवीण घाडगे, शिक्षक संघ,

३.

तालुकास्तरावर पगाराबाबत बराच विलंब लावला जातो. त्यामुळे कर्जाचे हप्ते प्रभावित होत आहेत. सीएमपी प्रणाली अवलंबणे आवश्यक आहे. सीएमपीमुळे मुख्याध्यापक हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे.

- वनिता बैताडे, शिक्षिका

.................

Web Title: Teachers don't get paid even after working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.