समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य शिक्षकांचे : संजीव देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:32 AM2021-07-25T04:32:40+5:302021-07-25T04:32:40+5:30
किडगाव : ‘समाजाच्या व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. शिक्षकांनी दिलेल्या योगदानामुळेच नवीन पिढी घडते. समाजाला दिशा दाखवण्याचे ...
किडगाव : ‘समाजाच्या व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. शिक्षकांनी दिलेल्या योगदानामुळेच नवीन पिढी घडते. समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य शिक्षकांचे आहे,’ असे गौरवोद्गार अजिंक्यतारा साखर कारखान्याचे सचिव संजीव देसाई यांनी काढले.
अजिंक्यतारा माध्यमिक विद्यालय शाहूनगर शेंद्रे येथील मराठी व भूगोल विषयाचे आदर्श शिक्षक मारुती शिवदास यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देसाई होते.
यावेळी मुख्याध्यापक संजय नलवडे, अजिंक्यतारा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर पवार, केंद्रप्रमुख हनुमंत शिंदे, रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण यादव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यालयाचे शिक्षक पांडुरंग कणसे, शिवाजी मोरे, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नलवडे यांनी आपल्या मनोगतात शिवदास यांच्याबरोबरचा अनुभव या ठिकाणी व्यक्त केला.
सत्कारमूर्ती शिवदास म्हणाले, ‘संस्थेचे पदाधिकारी सर्व शिक्षकांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केल्यामुळेच मी शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवू शकलो.’
कार्यक्रमास हणमंत शिंदे, लक्ष्मण यादव, रामचंद्र साळुंखे तसेच माध्यमिक आणि प्राथमिक विभागाचे शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेताजी ननावरे यांनी सूत्रसंचालन केले. महेश जाधव यांनी आभार मानले.