शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील : रमेश काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:46 AM2021-09-10T04:46:19+5:302021-09-10T04:46:19+5:30
कुडाळ : जावळी तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता चांगली असून, शिक्षकांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान कौतुकास्पद आहे. त्यांचे विविध प्रश्न प्राधान्याने ...
कुडाळ : जावळी तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता चांगली असून, शिक्षकांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान कौतुकास्पद आहे. त्यांचे विविध प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे मत जावळीचे नूतन गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी व्यक्त केले.
जावळी तालुका शिक्षक समितीच्यावतीने नूतन गटविकास अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. तालुकाध्यक्ष सुरेश चिकणे, पतसंस्था चेअरमन धिरेश गोळे, कार्याध्यक्ष विजय बांदल, माजी अध्यक्ष विनायक चोरट, शामराव जुनगरे, विजय जुनगरे, सुधाकर दुदळे, ज्ञानेश्वर शिर्के, सुनील शिंदे, नितीन मोहिते आदी यावेळी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी काळे म्हणाले, जावळीचे शैक्षणिक वातावरण चांगले आहे. याठिकाणी विविध उपक्रम राबविले जातात. याकरिता माझ्याकडून संपूर्ण सहकार्य राहील. कोविडच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी दिलेले योगदान अनमोल आहे. पंचायत समिती स्तरावर शिक्षकांचे वेतन, मेडिकल बिले आदी वेळेत मार्गी लागतील. यावेळी समितीचे तालुकाध्यक्ष सुरेश चिकणे यांनी तालुक्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक कामकाजाबाबत माहिती दिली. तसेच शिक्षक समितीकडून आपल्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाला संपूर्ण सहकार्य राहील, असे सांगितले. नितीन मोहिते यांनी आभार मानले.