कोपर्डे हवेलीची पथकाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:39 AM2021-04-04T04:39:34+5:302021-04-04T04:39:34+5:30
यावेळी अखिल भारतीय स्वराज संस्थेचे अधिकारी विजय शिंदे, सर्वेक्षण अधिकारी सागर कडव, सरपंच नेताजी चव्हाण, उपसरपंच शुभांगी चव्हाण, ग्रामविकास ...
यावेळी अखिल भारतीय स्वराज संस्थेचे अधिकारी विजय शिंदे, सर्वेक्षण अधिकारी सागर कडव, सरपंच नेताजी चव्हाण, उपसरपंच शुभांगी चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, अमित पाटील, डॉ. रघुनाथ खरात, वंदना लोहार, शोभा चव्हाण, स्मिता साळवे, उज्ज्वला होवाळ, अंगणवाडी सेविका सुरेखा पवार आदी उपस्थित होते.
कोपर्डे हवेली गावची लोकसंख्या पाच हजारांहून जास्त आहे. गावाच्या दृष्टीने सांडपाणी आणि कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दिवसेंदिवस गावची लोकसंख्या वाढत असल्याने गाव विस्तारत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रस्तावित अहवाल तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेची पाहणी करण्यात आली असून, शासनाला हा प्रस्तावित अहवाल सादर करण्यात येणार आहे.
फोटो : ०३केआरडी०१
कॅप्शन : कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन पथकाकडून पाहणी करण्यात आली. त्यावेळी विजय शिंदे, सागर कडव, सरपंच नेताजी चव्हाण, उपसरपंच शुभांगी चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.