तंत्रज्ञान अवगत केले आता जागतिक स्पर्धेची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:54 AM2021-01-02T04:54:09+5:302021-01-02T04:54:09+5:30
सातारा : कोरोनाच्या महामारीमुळे शिक्षण क्षेत्राला फारसा फटका बसणार नाही असे वाटले होते. मात्र, सर्वाधिक फटका हा याच क्षेत्राला ...
सातारा : कोरोनाच्या महामारीमुळे शिक्षण क्षेत्राला फारसा फटका बसणार नाही असे वाटले होते. मात्र, सर्वाधिक फटका हा याच क्षेत्राला बसला. सर्व शिक्षण संस्था बंद राहिला अजूनही बंदच आहेत. तरी देखील या व्यवस्थेने कूस बदलली असून आधुनिकतेचा वसा घेतला आहे.
शिक्षणातील डिजिटल तंत्रज्ञान काही दिवसात येईल अशी अपेक्षा होती. मात्र, कोरोनामुळे ते खूपच वेगाने आले आणि सर्वांनी ते स्वीकारले देखील. शिक्षकांबरोबरच विद्यार्थीही टेक्नोसव्ही झाले आणि तांत्रिक उपकरणे सहज वापरु लागले. पालकांनाही आश्चर्य वाटेल या पद्धतीने त्यांची हाताळणी होती. आता याच्याही पुढे जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांनाही जागतिक स्पर्धेत उतरावयाचे आहे.
नव्याचा शोध आणि बोध
शिक्षण क्षेत्रात सातत्याने बदल होत असतात. हे बदल स्वीकारून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागते. त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेतल्यानंतर आता जागतिक स्पर्धेत उतरण्याची तयारी सुरु आहे. त्यापद्धतीने शाळांनी नियोजन केले आहे. स्पर्धेच्या युगात हे आवश्यक आहे.
या नवीन वर्षात अजूनही नवीन उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा विकास होईल आणि शिक्षण क्षेत्र आणखी समृद्ध होण्यास मदत होईल.