हृदयद्रावक! सातारचा २२ वर्षीय 'वीरपुत्र' देशासाठी शहीद; ५ दिवसांपूर्वीच यात्रेसाठी आला होता गावी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 08:13 PM2023-04-15T20:13:13+5:302023-04-15T20:14:06+5:30
tejas mankar news : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील २२ वर्षीय जवान भारतमातेसाठी शहीद झाला आहे.
tejas mankar indian army । सातारा : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील २२ वर्षीय जवान भारतमातेसाठी शहीद झाला आहे. तेजस लहुराज मानकर हा वीरपुत्र पंजाब भटिंडा कॅम्पमध्ये देशसेवेसाठी तैनात असताना डोक्यात गोळी लागली असता शहीद झाला. खरं तर तेजसला उपचारासाठी मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण दुर्दैवाने त्याची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी तपासाअंती तेजसला मृत घोषित केले. लक्षणीय बाब म्हणजे तेसस ज्या कॅम्पमध्ये तैनात होता तिथे झालेल्या गोळीबारात एकूण चार जवान शहीद झाले आहेत.
५ दिवसांपूर्वी होता गावात अन्...
दरम्यान, तेजस अलीकडेच यात्रेसाठी गावी आला होता. गावची यात्रा उरकून तो पुन्हा देशसेवासाठी रूजू झाला पण सुट्टीवरून गेल्यानंतर पाचच दिवसांत तो देशासाठी शहीद झाल्याचे वृत्त समोर आले. घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना समजताच गावकऱ्यांसह जावली तालुक्यावर शोककळा पसरली. जाबमधील भंटिडा लष्करी छावणीत गोळीबार कुणी केला. याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
कुटुंबाचा वारसा जपणारा तेजस देशासाठी शहीद
मात्र, तूर्त लष्कराने याला दहशतवादी हल्ला म्हटलेले नाही. या गोळीबाराच्या घटनेत तेजस मानकर याच्या डोक्याला गोळी लागली होती. शहीद जवानांना गोळी कशी लागली याबाबत देखील पोलिसांचे पथक अधिक तपास करत आहे. तेजस हा दोन वर्षांपूर्वीच लष्करात भरती झाला होता. त्याचे वडील देखील सैन्यदलात कार्यरत होते, ते मेजर पदावरुन निवृत्त झाले आहेत. याशिवाय त्याचा भाऊ देखील सध्या सैन्यदलात असून देशसेवा बजावत आहे. सैनिकांची धरती म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या सातारचा आणखी एक जवान शहीद झाल्याने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"