राज्यातील मंदिरे सुरू करावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:26 AM2021-07-21T04:26:10+5:302021-07-21T04:26:10+5:30
सातारा : राज्यातील मंदिरे शासनाने सुरू करावीत, मंदिरे व पुजारी (गुरव) यांना विशेष आर्थिक मदत मिळावी, यांसह अन्य ...
सातारा : राज्यातील मंदिरे शासनाने सुरू करावीत, मंदिरे व पुजारी (गुरव) यांना विशेष आर्थिक मदत मिळावी, यांसह अन्य मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकरी कार्यालय, सातारा येथे अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवाजीराव साखरे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांना ई-मेल करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष शिवाजी साखरे, महिला मुख्य सरचिटणीस श्रद्धा साखरे, सांस्कृतिक समिती कार्याध्यक्ष कृष्णराव क्षीरसागर, महिला समन्वय सरचिटणीस माधवी साळुंखे, देवस्थान समन्वय सरचिटणीस अरुण गुरव, युवा समन्वय सरचिटणीस शिवलिंग क्षीरसागर, महिला जिल्हा अध्यक्ष स्मिता क्षीरसागर, राहुल क्षीरसागर, वैशाली पुजारी, माण तालुका अध्यक्ष वैभव गुरव, सातारा शहर महिला अध्यक्ष रूपाली गुरव, सोनाली क्षीरसागर, मधुकर धुमाळ जयकुमार गुंजाणे, राजेंद्र गुरव यांसह सातारा जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.