Satara News: वडजल येथे टेम्पो-कारला भीषण अपघात, सुदैवाने जिवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 04:10 PM2023-03-25T16:10:12+5:302023-03-25T16:11:25+5:30

खड्यामुळे चालकाचा ताबा सुटून टेम्पो विरुध्द मार्गावर गेला

Tempo-car meets with fatal accident at Vadajal Satara | Satara News: वडजल येथे टेम्पो-कारला भीषण अपघात, सुदैवाने जिवितहानी टळली

Satara News: वडजल येथे टेम्पो-कारला भीषण अपघात, सुदैवाने जिवितहानी टळली

googlenewsNext

मलटण : पुणे-पंढरपूर महामार्गावरील वडजल ता. फलटण येथे टेम्पो-कारला भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटून टेम्पो विरुध्द दिशेला गेल्याने दोन्ही वाहनांची समोरा-समोर धडक झाली. सुदैवाने अपघात कोणतीही जिवितहानी झाली नाही. जखमींनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दूध वाहतूक करणारा टेम्पो (एम.एच-१०-बी.आर -३८०३) पुण्याकडून फलटणकडे निघाला होता. तर, कार चालक (एम.एच-५०-यू-०६७४) फलटणहून पुण्याकडे जात होता. वडजल येथे पालखी महामार्गाचे काम सुरू असून खड्यामुळे टेम्पो चालकाचा ताबा सुटून टेम्पो विरुध्द मार्गावर गेला.

यावेळी टेम्पो अन् कारची समोरा-समोर भीषण धडक झाली. अपघातातील जखमींना उपचारासाठी फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: Tempo-car meets with fatal accident at Vadajal Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.