टेम्पोचालकाला खाली ओढले; शिवीगाळ, धारदार शस्त्रहल्ला

By नितीन काळेल | Published: June 21, 2024 09:30 PM2024-06-21T21:30:32+5:302024-06-21T21:30:39+5:30

सातारा तालुका ठाण्यात तक्रार : पोलिसांत चाैघांविरोधात गुन्हा नोंद 

Tempo driver pulled down; Abuse, assault with sharp weapons | टेम्पोचालकाला खाली ओढले; शिवीगाळ, धारदार शस्त्रहल्ला

टेम्पोचालकाला खाली ओढले; शिवीगाळ, धारदार शस्त्रहल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क 
सातारा : सातारा तालुक्यातील लिंब खिंड येथे शिवीगाळ करत ३५ हजार रुपये देणार आहे की नाही, म्हणत टेम्पो अडवून चालकाला मारहाण करून लुटण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चाैघांच्याविरोधात दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दि. १९ जून रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी अभिजित शशिकांत शिंदे (रा. कोपर्डे, ता. खंडाळा, सध्या रा. गोडोली, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार रूपेश गुलाबराव चव्हाण (रा. दहिगाव, ता. कोरेगाव) आकाश चव्हाण (पूर्ण नाव आणि पत्ता नाही) आणि अनोळखी दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

तक्रारदार शिंदे हे टेम्पो घेऊन येत असताना लिंब खिंड येथे संशयितांनी तो अडवला. त्यानंतर चालक शिंदे यांना खाली ओढून शिवीगाळ करत तू आमचे ३५ हजार कधी देणार आहे की नाही, असे म्हणून लोखंडी राॅड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर खाली बसलेले तक्रारदार शिंदे हे उठत असताना पुन्हा धारदार हत्याराने मारून जखमी केले. यामध्ये तक्रारदार शिंदे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन गहाळ झाली. त्यानंतर टेम्पोची चावी घेऊन संशयित निघून गेले.

सातारा तालुका पोलिस ठाण्यात चाैघांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.
 

Web Title: Tempo driver pulled down; Abuse, assault with sharp weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.