चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:39 AM2021-03-18T04:39:45+5:302021-03-18T04:39:45+5:30
प्रदीप मुसळे (वय २७) व अमर गुरव (वय ३०, दोघेही रा. गडहिंग्लज ) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. ...
प्रदीप मुसळे (वय २७) व अमर गुरव (वय ३०, दोघेही रा. गडहिंग्लज ) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो क्रमांक (क्र. एमएच ०९ एफ एल १२३९) मधून दोघे जण गडहिंग्लजवरून काजूच्या पिशव्या घेऊन पुण्याकडे जात होते. पुणे-बंगळूर महामार्गावर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास येथील सह्याद्री इक्विपमेंटसमोर आले असता चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो दुभाजकाला धडकून महामार्गावरच उलटला.
अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, रमेश खुणे, जितेंद्र भोसले, सदाशिव साठे यांच्यासह महामार्ग पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बॅरिकेट लावून महामार्गावरील वाहतूक उपमार्गावरून वळवण्यात आली. अपघातात महामार्गावर पडलेल्या काजूच्या पिशव्या बाजूला काढून घेतल्या. पलटी झालेल्या टेम्पोमधील पिशव्याही बाहेर काढून टेम्पो क्रेनच्या सहाय्याने सरळ केला. कऱ्हाड शहर अपघात विभागाचे हवालदार खलिल इनामदार व प्रशांत जाधव यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला.
फोटो : १७केआरडी०६
कॅप्शन : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर येथे काजुची वाहतूक करणारा टेम्पो उलटला. त्यामुळे काजुच्या पिशव्या रस्त्यावर विखुरल्या होत्या.