कऱ्हाडच्या वाहतुकीत आज तात्पुरता बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:35 AM2021-01-18T04:35:09+5:302021-01-18T04:35:09+5:30
सरोजिनी पाटील म्हणाल्या, शहरातील रत्नागिरी गोडावून येथे मतमोजणी होणार असल्याने विजय दिवस चौक ते रत्नागिरी गोडावूनकडे जाणारा रस्ता, कार्वे ...
सरोजिनी पाटील म्हणाल्या, शहरातील रत्नागिरी गोडावून येथे मतमोजणी होणार असल्याने विजय दिवस चौक ते रत्नागिरी गोडावूनकडे जाणारा रस्ता, कार्वे नाका ते भेदा चौक जाणारा रस्ता, दत्त चौक ते भेदा चौक जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच कार्वे नाक्याहून शहरात येणारी वाहतूक झेंडा चौक ते कोळेकर हॉस्पिटल, पोपटभाई पेट्रोल पंपाकडे वळविण्यात आली आहे. तसेच विजय दिवस चौकापासून येणारी वाहने दत्त चौक ते नवीन तहसील कार्यालय इमारतमार्गे कोल्हापूर नाक्याकडे जातील. पोपटभाई पेट्रोल पंप ते भेदा चौक मार्गे विटा बाजूकडे जाणारे वाहने शाहू चौक, दत्त चौक मार्गे विजय दिवस चौक येथे जातील.
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान इतर गावावरून येणा-या लोकांची संख्या व वाहनांची संख्या याचा विचार करून त्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी अनुषंगाने येणारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची वाहने नवीन तहसील कार्यालय व क-हाड तालुका पोलीस ठाण्याच्या पाठीमागील मैदानात पार्क करावीत. तसेच मतमोजणी प्रक्रिया पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी येणा-या ग्रामस्थांची वाहने पार्क करण्याची सोय कल्याणी ग्राउंड या ठिकाणी करण्यात आली आहे.
वाहनधारकांनी आपली वाहने नियोजित रस्त्याने घेऊन जाण्याचे व पार्क करण्याचे आवाहन क-हाड वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी केले आहे.