वैफल्यग्रस्त अन्नदात्यासाठी दहा सूत्रे
By admin | Published: August 3, 2015 09:45 PM2015-08-03T21:45:45+5:302015-08-03T21:45:45+5:30
हे उपाय
शेतीप्रधान भारत देशाचा महत्त्वाचा घटक आहे. तोच सर्वांचा मूळ अन्नदाता आहे. परंतु, अनेक कारणाने वैफल्यग्रस्त म्हणून जीवन जगत आहे. त्याला कारणेही तसेच आहेत. त्यासाठी समाजाने दहासूत्रे अंगिकारल्यास त्याला नैरेश्येतून बाहेर काढण्यास मदत होणार आहे.त्याच्या वैफल्यग्रस्त जगण्याला कारणेही अनेक आहेत. कधीत त्याच्या चुकीमुळे तर कधी शासनाच्या धोरणामुळे. काही वेळेला निसर्गाच्या अवकृपेमुळे किंवा शेती व्यवसायातील घडी विस्कटल्यामुळे त्याच्या वाटाला नैराश्याचे जगणे येत आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या संदर्भात अप्रिय घटना वाचयला मिळत आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यानेच मार्ग काढला पाहिजे.त्यातून मार्ग काढणे अवघड नक्कीच नाही. उत्पन्न किती मिळेल याचा अंदाज विचारात घेऊनच त्या वर्षातील पूर्ण कालावधी, नियमित खर्चाच्या बाबतीत आहे. त्यावर किती खर्च करावा, याची नोंद व माहिती घेऊन त्याप्रमाणे खर्च करण्याची दक्षता घ्यावी. शेती सुधारण्यासाठी सामाजिक संस्था, अभ्यासू व्यक्ती, प्रसिद्धी माध्यमे यांचाही आधार घ्यावा. -- सुधाकर कर्र्पे
हे उपाय
आर्थिक उत्पन्नाचा विचार करुन पिकांसाठी खर्च करावा.
लग्न, उत्सव, सोहळ्यात दिखाव्यासाठी खर्च टाळा
पारावर एकमेकांची निंदा नालस्ती करण्यापेक्षा शेती विकासावर गप्पा माराव्यात.
कुटुंबनियोजन करुन मुलांना उच्च शिक्षण द्यावे.
मुलींच्या लग्नासाठी सुरुवातीपासून बचत करुन ठेवावी.
स्थावर मालमत्तेसंदर्भातील खटल्यांमध्ये पैसा खर्च करण्याऐवजी शेतात करावा.
उत्पन्नातील ठरावीक हिस्सा बचत करावा, तो अडचणीत उपयोगी येईल.
शेतात जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याची जबाबदारी त्याचीच आहे.
मजुरांवर अवलंबून राहू नये.