या बाधित महिलेच्या संपर्कात आणखी कोणी आले आहे का, प्रशासन शोध घेत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 12:49 PM2020-04-30T12:49:53+5:302020-04-30T12:53:02+5:30

संबंधित कोरोना बाधित महिलेचा सिव्हिलमध्ये वावर होत होता. त्यामुळे बरेच कर्मचारी या महिलेच्या निकटसहवासात आले असण्याची शक्यता आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आपापली काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी केले आहे.

Ten quarantine in contact with an affected woman in Satara | या बाधित महिलेच्या संपर्कात आणखी कोणी आले आहे का, प्रशासन शोध घेत आहे

या बाधित महिलेच्या संपर्कात आणखी कोणी आले आहे का, प्रशासन शोध घेत आहे

googlenewsNext
ठळक मुद्देसाताऱ्यातील बाधित महिलेच्या संपर्कातील दहाजण क्वारंटाईनतिच्यामुळे झाले आणखी १० जण क्वॉरंटाईन! सातारा वाढतेय...

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या दहाजणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या बाधित महिलेच्या संपर्कात आणखी कोणी आले आहे का, याचा प्रशासन शोध घेत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील ३६ वर्षीय महिला कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे बुधवारी निष्पन्न झाले होते. ही संबंधित महिला कोरोना बाधित व्यक्तींचे एक्सरे काढण्याचे काम करत होती. त्यामुळेच या महिलेला कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर येत आहे. या महिला कर्मचाºयाच्या संपर्कात आलेल्या सिव्हिलमधील तीन तर ती राहत असलेल्या परिसरातील सातजणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने सर्व कर्मचारी धास्तावले आहेत. त्यामुळे अनेकजण रजा घेण्याच्या विचारात आहेत. संबंधित कोरोना बाधित महिलेचा सिव्हिलमध्ये वावर होत होता. त्यामुळे बरेच कर्मचारी या महिलेच्या निकटसहवासात आले असण्याची शक्यता आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आपापली काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी केले आहे.

 

Web Title: Ten quarantine in contact with an affected woman in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.