विनाकारण फिरणाऱ्यांची तळमावलेत चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:50 AM2021-06-16T04:50:09+5:302021-06-16T04:50:09+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधित आकडा कमी झाला असला तरी पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने अनलॉकमध्ये निर्बंध कडक आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी ...
जिल्ह्यात कोरोनाबाधित आकडा कमी झाला असला तरी पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने अनलॉकमध्ये निर्बंध कडक आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी २ आणि शनिवार व रविवार वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यात दूध, मेडिकल, खते, बी-बियाणे या दुकानांव्यतिरित इतर दुकाने बंद आहेत. मात्र, या-ना त्या कारणाने नागरिक घराबाहेर पडत आहेत. ढेबेवाडी पोलिसांनी तळमावले येथे रविवारी सकाळी कारवाई करत रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. याकामी तळमावले आरोग्य केंद्राची मदत घेण्यात आली. पुढे कोरोना चाचणी सुरु असल्याने अनेकांनी त्या ठिकाणाहून पळ काढल्याचे दिसून आले.
विनाकारण बाहेर फिरू नका, असे पोलीस वारंवार सांगत आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी लोक रस्त्यांवर विनाकारण फिरताना आढळून येत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी दिली. या वेळी तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक जामसिंग पावरा, आरोग्यसेवक रोहित भोकरे, स्वप्नील कांबळे, पोलीस कर्मचारी अजय माने, एम. ए. पवार, पोलीस पाटील अमित शिंदे, विशाल पाटील यांनी या कारवाईत भाग घेतला.
................................................................