..त्यामुळेच दंगली घडवल्या जातायंत, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल 

By नितीन काळेल | Published: June 7, 2023 06:26 PM2023-06-07T18:26:25+5:302023-06-07T18:27:23+5:30

'मोदींची जादू चालणार नाही'

..that is why riots are being created, Congress leader Prishviraj Chavan attacks BJP | ..त्यामुळेच दंगली घडवल्या जातायंत, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल 

..त्यामुळेच दंगली घडवल्या जातायंत, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल 

googlenewsNext

सातारा : ‘द्वेषाचं वातावरण केल्याशिवाय भाजपला यश मिळत नाही. हे ओळखूनच आताही दंगली घडवल्या जात आहेत. पण, देशात आता कर्नाटकच्या यशामुळे आपण भाजपला हरवू शकतो असा विश्वास निर्माण झालेला आहे. त्यामुळे मोदींची जादू चालणार नाही,’ असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच संजय राऊत यांनाही त्यांनी अप्रत्यक्षपणे चपराक लगावली.

येथील काॅंग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, अजित पाटील-चिखलीकर, प्रा. विश्वंभर बाबर, अन्वर पाशा खान, रजनी पवार, धनश्री महाडिक, विकास गोंजारी, संदीप माने आदी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘ काॅंग्रेसच्या वतीने मुंबई वगळता राज्यातील ४२ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यामधून काही बाबी समोर आल्या. आता पुढील बैठक १३ जूनला मुंबईत होणार आहे. सध्याचे राज्य आणि देशातील चित्र पाहता परिवर्तन होण्यासारखी स्थिती आहे. कर्नाटकमध्ये काॅंग्रेसचे २३६ आमदार निवडून आले. त्यामुळे मोदींचा करिष्मा संपला आहे. आगामी काळात चार राज्यांत विधानसभा निवडणूक होत आहेत. त्यात आमची ताकद दिसून येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन रेल्वे सुरू करत आहेत. पण, दुसरीकडे सुरक्षिततेबाबत दुर्लक्ष होत आहे, असे सांगून चव्हाण पुढे म्हणाले, रेल्वेबाबत संसदेतही चर्चा कधी होत नाही. ओडिसातील रेल्वे दुर्घटनेप्रकरणी आता नैतिक जबाबदारी स्वीकारुन रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. त्याचबराेबर भाजप खासदार ब्रीजभूषण सिंगच्या विराेधात खेळाडुंनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या आहेत. गुन्हा नोंद झालेला आहे. तरीही पंतप्रधान ब्रिजभूषण सिंग हे दबंग खासदार आणि ठाकूर समाजातील प्रभावशाली नेते असल्याने काही बोलत नाहीत. एकीकडे ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ म्हणणारे बोगस आहेत. ब्रिजभूषण सिंग यांना अटक झालीच पाहिजे.

जागा वाटप घोषणा दिल्लीतून; राऊतांच्या कृतीबद्दल समर्थन नाही...

पत्रकार परिषदेत पृश्वीराज चव्हाण यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिले. यामध्ये महाविकास आघाडीत जागेवरुन दावे केले जात आहे. खासदार संजय राऊत यांनीही वक्तव्य केल्याचा प्रश्न केला. यावर चव्हाण यांनी जागा वाटपाबाबत आता बोलणे योग्य नाही. याची घोषणा दिल्लीतून होईल असे उत्तर दिले. तर खासदार डाॅ. श्रीकांत शिंदेंबाबत पत्रकारांनी प्रश्न केल्यावर संजय राऊत यांनी केलेली कृती योग्य का ? असा प्रश्न केल्यावरही चव्हाण यांनी याचे समऱ्थन करता येणार नाही, असा एकप्रकारे टोलाच राऊतांना लगावला.

Web Title: ..that is why riots are being created, Congress leader Prishviraj Chavan attacks BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.