भ्रष्ट जुमला पार्टीमुळे राज्यातील वातावरण गढूळ, रोहिणी खडसे यांचे जोरदार टीकास्त्र

By दीपक देशमुख | Published: January 24, 2024 05:17 PM2024-01-24T17:17:17+5:302024-01-24T17:18:51+5:30

शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली ते पुन्हा निवडून आले नाहीत, हा इतिहास 

The atmosphere in the state is bad because of BJP, criticism of Rohini Khadse | भ्रष्ट जुमला पार्टीमुळे राज्यातील वातावरण गढूळ, रोहिणी खडसे यांचे जोरदार टीकास्त्र

भ्रष्ट जुमला पार्टीमुळे राज्यातील वातावरण गढूळ, रोहिणी खडसे यांचे जोरदार टीकास्त्र

सातारा : राज्यात भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून वातावरण गढूळ गेले आहे. त्यामुळे स्वकियांपेक्षा भविष्यात आमच्यासमोर या भ्रष्ट जुमला पार्टीचेच आव्हान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले.

सातारा येथे राष्ट्रवादी भवनात महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी रोहिणी खडसे आल्या होत्या. तत्पुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे, समिंद्रा जाधव, राजकुमार पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, देशात व राज्यात भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. दबावतंत्राच्या या विचारधारेविरोधात राष्ट्रवादी खंबीरपणे उभा आहे. मोदी सरकारविराधोत खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दौरे सुरू असल्याचे खडसे म्हणाल्या.

खडसे म्हणाल्या, माझी नियुक्ती झाल्यानंतर राज्याचा दौरा केला आहे. यादरम्यान महागाई, बेरोजगारीमुळे महिलांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. अत्याचाराच्या घडल्या तरी कार्यवाही होत नाही. देशातही अशीच परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील महिला मल्लांना पारितोषिक परत करावे लागणे, हे दुर्दैवी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस महिलांमध्ये अंतर्गत वाद नाहीत. मतभेद असू शकतात. परंतु, मनभेद नाहीत. पक्षात मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. हा पक्ष लोकशाहीनुसार चालतो. कार्यकर्त्याला बोलण्याची संधी दिली जाते. इतर पक्षांमध्ये दबावतंत्र वापरले जाते, कार्यकर्त्याला बोलू दिले जात नाही, तशी परिस्थिती राष्ट्रवादीत नाही. गेल्या दहा वर्षाची आकडेवारी पाहता भाजपाच्या काळात सर्वात कमी महिला लोकप्रतिनिधी निवडून गेले आहेत. परंतु, राष्ट्रवादी पक्षातून जास्तीत जास्त संधी देण्यात येणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याबाबत विचारले असता सुनील माने म्हणाले, मी अजित पवार यांच्यासमवेत अनेक वर्षे राजकारण केले आहे. तथापि, मी शरद पवार यांच्या विचारांचा कार्यकर्ता असून शेवटपर्यंत त्यांच्याच पाठीशी उभा राहणार आहे.

सायबांना सोडणारा निवडून येत नाही

सध्या राष्ट्रवादीतून अनेकजण पक्ष सोडून गेल्याबाबत विचारले असता रोहिणी खडसे म्हणाल्या, खासदार शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली, ते पुन्हा निवडून आले नाहीत, हा इतिहास आहे. २०१९मध्येही याची प्रचिती आली असल्याचे यावेळी खडसे म्हणाल्या.

Web Title: The atmosphere in the state is bad because of BJP, criticism of Rohini Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.