ssc exam end: विद्यार्थी म्हणाले, घुमेंगे, फिरेंगे, फोटो निकालेंगे और क्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 06:51 PM2022-04-04T18:51:32+5:302022-04-04T18:54:09+5:30
दहावीची परिक्षेचा भुगोलाचा शेवटाचा पेपर दिल्यानंतर परिक्षा केंद्राबाहेरच दहावीच्या विद्यार्थ्यांनी कल्ला
सातारा : कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी बोर्डाच्या आॅफलाईन परिक्षा झाल्यानंतर परीक्षेचं दिव्य पार पाडून मुलं आताशी तणावमुक्त झाली आहेत. करिअर, फ्युचर, क्लास असे शब्दही त्यांना नकोसे झाले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस मुलांना मुलांच्या विश्वात सोडून पालकांनी मन:शांती अनुभवणे महत्वाचे बनले आहे. मुलांना पुढचं प्लॅन काय म्हटल्यावर ‘घुमेंग, फिरेंगे, फोटो निकालेंगे और क्या’ अशी उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिली.
दहावीची परिक्षेचा भुगोलाचा शेवटाचा पेपर दिल्यानंतर परिक्षा केंद्राबाहेरच दहावीच्या विद्यार्थ्यांनी कल्ला केला. आता निकालानंतर हे विद्यार्थी शालेय आयुष्याला गुडबाय करत महाविद्यालयीन शिक्षणाकडे झेप घेतील. शेवटचा पेपर दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी पार्टी करून परस्परांना बाय बाय केले.
सुट्टीत इकडेही लक्ष द्या!
नवीन आणि उपक्रमशील कार्य करणाऱ्यांना भेटणे
मनात इंग्रजीविषयी असलेली भिती घालविण्यासाठी स्वतंत्र क्लासची व्यवस्था करणे
मोबाईलवर अनावश्यक ब्राऊजिंग करण्यापेक्षा करिअरच्या उत्तम संधीची माहिती मिळविणे
निसर्गात पायी भ्रमंती करून आनंद घेणे
अभ्यासाच्या ताणातुन मुक्त झालेल्या मुलांना रात्री उशिरापर्यंत जागरण करून सकाळी उशिरापर्यंत झोपायचं आहे
परिक्षा असल्यामुळे मोबाईल, त्यावरील गेम आणि मित्र मैत्रीणींबरोबरचे दुरावलेले चॅटिंगमध्ये पुन्हा वेळ घालवायचा आहे