Satara: नीरा नदीत बुडालेल्या परप्रांतीय फरसाण विक्रेत्याचा मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 18:13 IST2024-05-14T18:12:10+5:302024-05-14T18:13:08+5:30
मुराद पटेल शिरवळ: खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील नीरा नदीच्या पात्रात बुडालेल्या परप्रांतीय फरसाण विक्रेता सुरेंदर जोहरसिंग शिकरवार (वय 35, ...

Satara: नीरा नदीत बुडालेल्या परप्रांतीय फरसाण विक्रेत्याचा मृतदेह सापडला
मुराद पटेल
शिरवळ: खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील नीरा नदीच्या पात्रात बुडालेल्या परप्रांतीय फरसाण विक्रेता सुरेंदर जोहरसिंग शिकरवार (वय 35, मुळ रा.आग्रा उत्तरप्रदेश,सध्या रा.संगमवाडी जि.पुणे) याचा मृतदेह शोधण्यात तब्बल २८ तासानंतर यश आले.
शिरवळ येथील ग्रामदैवत श्री अंबिका माता यात्रेकरिता उत्तरप्रदेश येथील फरसाण विक्रीकरिता साधारणपणे २० ते २५ व्यक्ती आले आहेत. दरम्यान, काल, सोमवार नीरा नदी पात्रात अंघोळीकरिता संबंधित विक्रेते गेले असता सुरेंदर शिकरवार बुडाला होता. घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस, रेस्क्यू टिमसह घटनास्थळी शोधमोहीम राबविली. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे सुरेंदर याचा मृतदेह शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
दरम्यान, आज मंगळवार पुन्हा सकाळी शिरवळ रेस्क्यू टीम व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सहाय्याने शोधमोहीम राबविली असता शिरवळ रेस्क्यू टिमचे गोरख जाधव यांना सुरेंदर याचा मृतदेह सापडला. शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली आहे.