जिल्हाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीचे कारण मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशोक गायकवाड यांची मागणी

By दीपक देशमुख | Published: June 10, 2023 04:25 PM2023-06-10T16:25:50+5:302023-06-10T16:26:07+5:30

युती केली म्हणजे तुमच्याकडे भांडी घासायला नाही

The Chief Minister should give the reason for the hasty transfer of Collectors, Ashok Gaikwad's demand | जिल्हाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीचे कारण मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशोक गायकवाड यांची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीचे कारण मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशोक गायकवाड यांची मागणी

googlenewsNext

सातारा : उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार मिळालेल्या जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची अकरा महिन्यांत बदली कशी केली जाते. बदली मागचे नेमके कारण मुख्यमंत्र्यानी जनतेला सांगावे अशी मागणी रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हाेते.

जिल्हाधिकारी जयवंशी हे सर्वसामान्यांना वेळ देणारे आणि त्यांची बाजू ऐकून घेणारे अधिकारी होते. त्यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी, बेकायदा बांधकामे कारवाई सूरू केली. या कारणामुळे त्यांची बदली केली असेल तर हे निंदनीय असल्याचेही ते म्हणाले. तसेच अक्षय भालेराव हत्या, बोतालजी आत्महत्या व इतर अनेक अत्याचारांच्याविरोधात तीव्र जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा ही दिला. 

कोल्हापुरातील दंगलीबाबत गायकवाड म्हणाले, दंगलीने प्रश्न सुटत नाहीत. दंगलीत सर्वसामान्यांचीच घरे, दुकाने फुटतात. जे आक्षेपार्ह प्रकार करतो, त्याविरोधात प्रशासनाला धारेवर धरून कारवाईची मागणी केली होती असे मत व्यक्त केले.

महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडीबाबतही त्यांनी भाष्य केले. एकेरी वाहतुकीमुळे स्थानिक, विद्यार्थ्यांना त्रास होणार असून त्याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली. तसेच टोलनाक्यावरून मोठ्या प्रमाणावर टोल वसुली होत असताना त्याप्रमाणात सुविधा मिळत नाहीत. पाच सेकंदात गाडी पास झाली नाही तर टोल द्यायचा नाही, असा नियम असताना दोन-दोन कि.मी रांगा लागतात. महाबळेश्वरमधील टोलनाका बंद करण्याची मागणी त्यांनी केली. 

युती केली म्हणजे तुमच्याकडे भांडी घासायला नाही

अधिकाऱ्यांच्या बदलीवरून अशोक गायकवाड म्हणाले, तुमच्या सोयीसाठी व लॉबिंगसाठी अधिकारी बदलले जात असतील तर सर्वसामान्य असुक्षित होणार आहेत. आमची युती तुमच्या सोबत आहे म्हणजे आम्ही तुमच्या घरी भांडी घासायला नाही. आम्ही एका विचाराने तुमच्या सोबत आलो आहे. त्यामुळे आम्ही काही निर्णय घेतला तर तुम्हाला परवडणार नाही, असा इशाराही दिला.

Web Title: The Chief Minister should give the reason for the hasty transfer of Collectors, Ashok Gaikwad's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.