सातारा गारठला! पारा १३ अंशापर्यंत घसरला, जागोजागी शेकोट्या पेटल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 02:21 PM2022-11-19T14:21:46+5:302022-11-19T14:22:13+5:30
महाबळेश्वरचा पाराही १२.०५ अंश नोंदला गेला.
सातारा : उत्तरेकडून थंडगार वारे वाहत असल्याने सातारा जिल्ह्यातही याचा परिणाम झाल्याने पारा घसरला आहे. शनिवारी सातारा शहराचे किमान तापमान १३.०२ अंशापर्यंत खाली आले होते. तर महाबळेश्वरचा पाराही १२.०५ अंश नोंदला गेला. यामुळे जिल्ह्यातील गारठ्यात आणखी वाढ झाली असून जागोजागी शेकोट्या पेटल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात यावर्षी थंडीला १५ दिवस अगोदर सुरुवात झाली आहे. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यापासून थंडी जाणवते. पण, यंदा ऑक्टोबरच्या मध्यानंतर जिल्हा गारठू लागला. सुरुवातीला काही दिवस किमान तापमान १३ अंशापर्यंत खाली आले होते. मात्र, त्यानंतर पारा वाढत गेला. सातारा शहरात तर २० अंशावर किमान तापमान गेलेले. त्यामुळे उकाडाही जाणवत होता. त्यानंतर मात्र, पारा घसरला. पण, १५ अंशाच्या खाली आला नव्हता. असे असतानाच दोन दिवसांपासून उत्तरेकडून थंडगार वारे वाहत आहेत. याचा परिणाम वातावरण बदल करण्यास कारणीभूत ठरला. त्यामुळे जिल्ह्यातील पारा एकदम १५ अंशाखाली आला आहे.
सातारा शहरात शुक्रवारी १५.०२ किमान तापमान होते. मात्र, शनिवारी दोन अंशाने उतरले. त्यामुळे साताऱ्याचा पारा १३.०२ अंश नोंद झाला. या हंगामातील हे आतापर्यंतचे निच्चांकी तापमान ठरले. यापूर्वी सातारा शहरात दोनवेळा १३.०२ अंशा तापमानाची नोंद झालेली. त्याचबरोबर महाबळेश्वर परिसरात गारठा कायम आहे. शनिवारी १२.०५ अंशाची नोंद झाली.
सातारा शहरातील किमान तापमान असे:
दि. ४ नोव्हेंबर १७.०९, दि. ५ - १६.०३, दि. ६ - १६.०९ , दि. ७ - १५.०५, दि. ८ - १५, दि. ९ - १५.०८, दि. १० - १४.०७, दि. ११ - १५.६, दि. १२ - १६.०८, दि. १३ - १५, दि. १४ - १६.०४, दि. १५ - १७.०४, दि. १६ - १५.०५, दि. १७ - १३.०४, दि. १८ - १५.०२ आणि १९ नोव्हेंबर १३.०२